---Advertisement---

MPL 2025 उद्घाटन सोहळ्याला बॉलीवूडचा तडका, या सेलिब्रिटी लावणार हजेरी

On: मंगळवार, जून 3, 2025 3:57 PM
---Advertisement---

महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या तिसऱ्या हंगामाला 4 जूनपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेचे तयारी अंतिम टप्प्यात झाली असून, सर्व संघ विजेतेपदासाठी झुंजण्याकरता सज्ज आहेत. असे असतानाच, स्पर्धेचा उद्घाटन सोहळा अतिशय भव्य दिव्य असेल. या उद्घाटन सोहळ्यात बॉलीवूडचा तडका लागणार असून, यामध्ये अनेक बड्या सेलिब्रिटी दिसतील.

एमपीएल 2025 चा उद्घाटन सोहळा पहिल्या दोन हंगामापेक्षा वेगळा असेल. यावेळी एमपीएल सोबतच प्रथमच वुमेन्स महाराष्ट्र प्रिमियर लीग ही महिला क्रिकेटपटूंची लीग ही पार पडेल. पाच जूनपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन ही एमपीएलसोबतच होईल. या उद्घाटन सोहळ्यात मराठी व हिंदी सिनेजगतील नामांकित सितारे खास परफॉर्मन्स सादर करतील. यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री चित्रांगदा सिंग हीचा समावेश आहे. याव्यतिरिक्त 5 युनिटी क्रू हा डान्स ग्रूप आपल्या अफलातून डान्सने चाहत्यांचे मनोरंजन करेल.

सेलिब्रिटी परफॉर्मन्ससह या सोहळ्याला लाईट आणि लेझर शो चार चांद लावेल. तर, सोहळ्याच्या सुरुवातीला शेकडो ड्रोनचा खास ड्रोन शो आयोजित केला जाणार आहे. जवळपास दोन तास चालणाऱ्या या सोहळ्यानंतर एमपीएलचा हंगामातील पहिला सामना रत्नागिरी जेट्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स असा रंगेल.

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या उद्घाटन सोहळ्यासाठी तसेच संपूर्ण स्पर्धेसाठी प्रेक्षकांना विनामूल्य प्रवेश दिला जाईल. मागील दोन हंगामात देखील एमसीएने अशाच प्रकारे चाहत्यांना विनामूल्य स्पर्धा पाहण्याची संधी दिली होती. तसेच, येणाऱ्या चाहत्यांकडून पार्किंगसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जाणार नाही. याव्यतिरिक्त सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये येणाऱ्या चाहत्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. ही स्पर्धा JioHotstar या ओटीटी प्लॅटफॉर्मवर व Star Sports 2 या चॅनलवर थेट आता येईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---