केंद्रीय माहिती आयाेगाने सोमवारी भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाला माहीती अधिकाराच्या कक्षेत आणले आहे. माहितीचा अधिकार देशात सर्वत्र लागु आहे. मात्र तो बीसीसीआयला आतापर्यंत लागू नव्हता.
केंद्रीय युवा आणि क्रिडा मंत्रालयाने याबाबत घोषणा करताना म्हटले आहे की माहिती अधिकाराच्या भाग 2 (एच) नुसार बीसीसीआयला पुर्तता करावी लागणार आहे.
न्यायालयाच्या मतानुसार बीसीसीआय ही देशातील एकमेव अशी संस्था आहे, की जी देशांर्तगत क्रिकेटच्या सामन्यांचे आयोजन करते, असे माहिती आयुक्त श्रीधर आचार्युलू यांनी 37 पानांच्या एका आदेशात म्हटले आहे.
त्यांनी त्यात कमिटी आॅफ अॅडमिस्टेटरला स्पष्ट निर्देश दिले की माहितीच्या आधिकार या कायद्यानुसार आवश्यक पात्रता असलेले केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकारी नियुक्त करावेत, तसेच त्यांच्या मदतीसाठी केंद्रीय सहाय्यक सार्वजनिक माहिती अधिकारी म्हणून नियुक्त करावे.
आचार्युलू यांनी असेही निर्देश दिले आहेत की 15 दिवसात त्याची कार्यवाही करावी त्यानंतर आॅनलाईन किंवा आॅफलाईन कोणत्याही स्वरूपातील अर्ज माहिती अधिकारा अंर्तगत स्विकारले जावेत.
गीता रानी यांनी बीसीसीआयला विचारलेल्या माहितीचे समाधान कारक उत्तर देण्यात आले नव्हते त्यामुळे त्यांनी केंद्रीय युवा आणि क्रिडा मंत्रालयात याची तक्रार दाखल केली होता.
बीसीसीआय आणि तिच्याशी असणाऱ्या सर्व सलग्न संघटनां माहितीच्या अधिकाराच्या कक्षेत येणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
शाहीद आफ्रिदी पुन्हा दिसणार क्रिकेट खेळताना–