भारताने घरच्या मैदानावर 2023च्या सुरूवातीलाच श्रीलंकेविरुद्ध (INDvSL)वनडे आणि टी20 मालिका आयोजित केल्या. टी20 मालिकेसाठी भारताच्या निवडकर्त्यांनी अनेक युवा खेळाडूंना संधी दिल्या. हे दोन्ही संघ जाहीर करण्याआधी अनेकांना आशा होती की मुंबईच्या त्या खेळाडूला जागा मिळेल, मात्र तसे झाले नाही. त्यानेही निराश न होता स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी सुरूच ठेवली. त्याचे नाव पृथ्वी शॉ.
सध्या भारताच्या स्थानिक क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफीचे (Ranji Trophy) वारे जोरदार वाहू लागले आहेत आणि यामध्ये पृथ्वी शॉ (Prithvi Shaw)) नावाचे वादळ घोघांवत आहे. त्याने मुंबईकडून खेळताना आसामविरुद्ध शतकी खेळी केली आहे. त्याने 107 चेंडूत 15 चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने 100 धावा पूर्ण केल्या. याचा अर्थ त्याने 66 धावा चेंडू सीमारेषपार टोलवतच केल्या. असे असले तरी त्याच्याकडे बीसीसीआयचे दूर्लक्ष आहे.
रणजीमध्ये मुंबई अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. मुंबई विरुद्ध आसाम सामना गुवाहाटीच्या अमिनगाव क्रिकेट ग्राउंडवर सुरू आहे. सामन्याचा मंगळवार (10 जानेवारी) पा पहिला दिवस असून आसामने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पृथ्वीने मुशीर खान याच्यासोबत पहिल्या विकेटसाठी 123 धावांची भागीदारी केली. मुशीर 42 धावा करत बाद झाला. पृथ्वीने पहिल्या सत्रातच शतकी खेळी केली.
2023च्या सत्रातील पृथ्वीचे हे पहिले शतक असून त्याच्या प्रथम श्रेणीतील हे 12वे शतक ठरले आहे. त्याने 45 चेंडूतच अर्धशतक पूर्ण केले होते. नुकतेच मुंबई क्रिकेट असोसिएशनचा वार्षिक पुरस्कार संमारभ पार पडला. त्यामध्ये त्याने 9 पुरस्कार जिंकले.
पृथ्वीला भारतीय संघात जागा का मिळत नाही? याचे उत्तर तर अद्याप कोणाकडेच नाही. तो ज्याप्रकारे स्थानिक स्पर्धांमध्ये धावांचा पाऊस पाडतो यावरून तरी त्याला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेमध्ये संधी द्यावी. त्याने 2018मध्ये भारताकडून पदार्पण केले होते. तसेच त्याने 2021नंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.
पृथ्वीने भारताकडून आतापर्यंत 5 कसोटी, 6 वनडे आणि एक टी20 सामना खेळला आहे. कसोटीमध्ये त्याने एक शतक आणि दोन अर्धशतके केली असून त्याने 9 डावांमध्ये 42.38च्या सरासरीने 339 धावा केल्या आहेत. त्याला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत संघात जागा न मिळाल्याने नव्या चर्चेला वाचा फुटली होती, आता त्याची स्थानिक स्पर्धांंमधील कामगिरी अशीच सुरू राहिली तर न्यूझीलंडविरुद्ध संधी मिळू शकते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटची नजर सचिनच्या ‘त्या’ वर्ल्ड रेकॉर्डवर, श्रीलंकेविरुद्ध करणार का कमाल?
फ्रान्सचा गोलकीपर-कॅप्टन ह्यूगो लॉरिसची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती, रिप्लेसमेंटचे नावही सांगितले






