भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका शुक्रवारी (22 सप्टेंबर) सुरू झाली. पहिला सामना मोहालीच्या आयएस बिंद्र स्टेडियमवर खेळला गेला. भारतासाठी सलामीवीर शुबमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांनी आपले-आपले अर्धशतक पूर्ण केले. सोबतच शतकी भागीदारी देखीर पूर्ण केली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताला विजयासाठी 277 धावांचे लक्ष्य मिळाले. भारतासाठी शुमबन गिल आणि ऋतुराज गायकवाड ही सलामीवीर जोडीने पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. अवघ्या 37 चेंडूत गिलने 50 धावा कुटल्या. गिलच्या वनडे कारकिर्दीतील ही 34 वी खेळी होती, ज्यामध्ये त्याने अर्धशतक ठोकले. 34 पैकी 9 डावांमध्ये गिलने अर्धशतक, तर 5 डावांमध्ये शतक ठोकले आहेत. 2023 मध्ये गिल विरोधी संघांसाठी अधिकच घातक ठरला आहे. सलामीला आलेल्या ऋतुराज गायकवाड यानेही 60 चेंडूत 50 धावांची खेळी पूर्ण केली. ऋतुराजचे चालू वर्षीतील वनडे आकडे देखील समाधानकारक राहिले आहेत.
पहिल्या वनडेसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी
ऑस्ट्रेलिया – डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्यूशेन, कॅमरून ग्रीन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू शॉर्ट, पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन ऍबॉट, ऍडम झम्पा.
महत्वाच्या बातम्या –
पाच विकेट्स घेताच शमीकडून ट्रेंट बोल्टच्या विक्रमाला धक्का! मिचेल स्टार्क सिंहासनावर कायम
शानदार शमी! मिळालेल्या संधीचे सोने करत उखडला ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ