मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील ३० वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पडला. हा सामना राजस्थानने ७ धावांनी जिंकत हंगामातील चौथा विजय नोंदवला. राजस्थानकडून जोस बटलरने शतकी खेळी करत, तर फिरकीपटू युजवेंद्र चहलने हॅट्रिकसह ५ विकेट्स घेत हा सामना गाजवला.
चहलची विक्रमी हॅट्रिक
या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना कोलकाता समोर २१८ धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. पण कोलकाताच्या फलंदाजांनीही चांगली कामगिरी करत हे आव्हान पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, १७ व्या षटकात चहल (Yuzvendra Chahal) गोलंदाजीला आला आणि त्याने सामन्याचे पारडेच राजस्थानच्या बाजूने फिरवले (RR vs KKR). त्याने या षटकातींल शेवटच्या सलग तीन चेंडूंवर श्रेयस अय्यर, शिवम मावी आणि पॅट कमिन्स यांना बाद केले आणि आयपीएलमधील आपली पहिली हॅट्रिक (IPL Hat-Trick) साजरी केली.
आयपीएल २०२२ हंगामातील ही पहिली हॅट्रिक ठरली आहे. तसेच चहल हा आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणारा एकूण १८ वा क्रिकेटपटू ठरला आहे. तसेच १२ वा भारतीय ठरला आहे. आत्तापर्यंत आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा हॅट्रिक अमित मिश्राने घेतली आहे. त्याने तीन वेळा हा कारनामा केला आहे. तसेच युवराज सिंगने दोन वेळा हॅट्रिक घेतली आहे. विशेष म्हणजे दोन्ही हॅट्रिक त्याने २००९ मध्ये घेतल्या आहेत. अन्य १४ गोलंदाजांनी प्रत्येकी एक वेळा हॅट्रिक घेतली आहे.
या खेळाडूंनी घेतली आहे आयपीएलमध्ये विकेट्सची हॅट्रिक –
२००८ – लक्ष्मीपती बालाजी, अमित मिश्रा, मखाया एनटिनी
२००९ – युवराज सिंग(दोन वेळा), रोहित शर्मा
२०१० – प्रविण कुमार
२०११ – अमित मिश्रा
२०१२ – अजित चंडिला
२०१३ – सुनील नारायण, अमित मिश्रा
२०१४ – प्रविण तांबे, शेन वॉटसन
२०१६ – अक्षर पटेल
२०१७ – सॅम्यूएल बद्री, अँड्र्यू टाय, जयदेव उनाडकट
२०१९ – सॅम करन, श्रेयस गोपाळ
२०२१ – हर्षल पटेल
२०२२ – युजवेंद्र चहल
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
एकच नंबर! कोलकाताच्या मावी-कमिन्स जोडीचा बाऊंड्री लाईनजवळ अप्रतिम कॅच, पाहा Video
Video: चहलचा कहर! आयपीएलमध्ये पहिली हॅट्रिक घेत अनोखे सेलिब्रेशन, पाहा कशा गेल्या विकेट्स
मोठी बातमी! ख्रिस्तियानो रोनाल्डोवर कोसळला दु:खाचा डोंगर, मुलाचे झाले निधन; वाचा सविस्तर