---Advertisement---

चहलच्या शानदार कामगिरीवर आरजे महावशची खास प्रतिक्रिया! प्रेमळ शब्दांनी जिंकलं सर्वांचं मन!

---Advertisement---

पंजाब किंग्जचा स्टार फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलने बुधवारी रात्री 30 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध आयपीएल 2025 मधील पहिली हॅट्ट्रिक घेतली. चहलच्या हॅट्ट्रिकने त्याची कथित प्रेयसी आरजे महवशचेही मन जिंकले. आरजे महवशने इंस्टाग्राम स्टोरीवर युझवेंद्र चहलवर प्रेमाचा वर्षाव केला. त्याच्या कामगिरीचे कौतुक केले.

चहलने सीएसकेविरुद्ध 19व्या षटकात हॅट्ट्रिकसह चार विकेट्स घेतल्या, ज्यामध्ये एमएस धोनीचा मोठा विकेट देखील समाविष्ट होता. या सामन्यात त्याने 3 षटकात 32 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. चहलच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे पंजाब किंग्ज चेन्नईला 190 धावांवर रोखण्यात यशस्वी झाला.

युझवेंद्र चहलच्या हॅट्ट्रिकवर आरजे महवशने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले, “गाॅड मोड ऑन क्या? युझवेंद्र चहल..तुझ्याकडे योद्ध्याची ताकद आहे सर.”

आरजे महवशने या स्टोरी सोबत एक गाणे देखील लावले आहे, ‘ओ शेरा उठ जरा फिर वही जलवा दिखा अपना, बडी बेताब है दुनिया तेरी परवाज देखने को, जमाना रुक गया तेरा वही अंदाज देखने को.’

चेन्नई सुपरकिंग्ज पहिल्या डावात खेळताना मर्यादित 20 षटकांत 190 धावा केल्या. ज्यात सॅम करनने सर्वाधिक 88 धावांची मोलाची कामगिरी केली.

191 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने 72 धावांची शानदार खेळी खेळली. त्याला सलामीवीर प्रभसिमरन सिंगने 54 धावांची खेळी खेळून चांगली साथ दिली. या दोघांना बाद केल्यानंतर पंजाब संघ एका क्षणी डगमगला, पण शेवटी संघाला दोन चेंडू शिल्लक असताना विजय मिळवता आला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---