---Advertisement---

अदृश्य होण्याची शक्ती मिळाली तर हा क्रिकेटपटू लाॅकडाऊनमध्ये येणार धोनीच्या घरी

On: बुधवार, मे 6, 2020 1:53 PM
---Advertisement---

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळेे सध्या भारतात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. त्यामुळे जवळजवळ दीड महिन्यापासून लॉकडाऊनमुळे घरातच असलेले क्रिकेटपटू सोशल मीडियावरुन चाहत्यांशी संपर्क साधत आहे. या बाबतीत सध्या सर्वाधिक सक्रिय असणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये युजवेंद्र चहल आहे.

चहलने गेल्या दीड महिन्यात आत्तापर्यंत अनेक लाईव्ह चॅट केले आहेत. असाच काही दिवसांपूर्वी त्याने टीव्ही प्रेसेंटर यशिका गुप्ताबरोबर इंस्टाग्रामवर व्हिडिओ चॅट सेशन केले. यावेळी चहलला यशिकाने विचारले होते की जर त्याला अदृश्य होण्याची शक्ती मिळाली तर तो कोणाला भेटेले. यावर चहलने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचे नाव घेतले. (chahal said he will head to ranchi and meet ms dhoni if he had the superpower to become invisible.)

चहल म्हणाला, ‘सध्या तरी मी माही भाईला पहायला रांचीला जाईल. जेेव्हा विमानप्रवास सुरु होईल तेव्हा मला जावे लागेल. मी २४ तास माझे इंस्टाग्राम चालू ठेवेल आणि त्याला इंस्टाग्रामवर आणण्याचा प्रयत्न करेल. मग मी पण पाहतो तो कुठे पळतो ते.’

https://www.instagram.com/p/B_uxya1p7o2/

चहलने याआधीही रविवारी धोनीबरोबरचा एक जूना फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. तसेच त्या फोटोला कॅप्शन दिले होते की ‘यष्टींच्या मागून या दिग्गजाकडून टिल्ली या नावाने दिलेल्या आवाजाची आठवण येत आहे.’

धोनी आता जवळजवळ १० महिन्यांपासून क्रिकेट खेळलेला नाही. तो भारताकडून शेवटचा जूलै २०१९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात खेळला आहे. त्यानंतर तो २०२० च्या आयपीएलमधून क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार होता. मात्र सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचा हा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग घडामोडी – 

प्रत्येक ९व्या चेंडूवर ‘हा’ खेळाडू टी२०मध्ये मारतो षटकार, कारकिर्दीत अशी केलीय षटकारांची बरसात

भर लाॅकडाऊनमध्ये सीएसके आरसीबीकडून पराभूत…

भारतीय गोलंदाज मागायचे आमची माफी, आम्ही करायचो चांगली धुलाई

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---