---Advertisement---

Video: चहलने विणले फिरकीचे जाळे; २ चेंडूत २ विकेट घेत टीम इंडियाला करून दिले सामन्यात पुनरागमन

---Advertisement---

श्रीलंका विरुद्ध भारत संघात मंगळवारी(२० जुलै) वनडे मालिकेतील दुसरा सामना होत आहे. कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेच्या दोन्ही युवा सलामीवीरांनी भारताच्या वेगवान गोलंदाजांचा यशस्वी सामना करत संघाला दमदार सलामी दिली. मात्र, भारताचा अव्वल फिरकीपटू युजवेंद्र चहल याने आपल्या फिरकीचे जाळे विणत भारताला पुन्हा एकदा फ्रंटफूट वर आणले.

श्रीलंकेची एक शानदार सुरुवात
पहिल्या सामन्यात ७ गड्यांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाकाने दुसऱ्या सामन्यातही नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेचे सलामीवीर अविश्का फर्नांडो व मिनोद भानुका यांनी संघाला दमदार सुरुवात झाली. भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर व हार्दिक पांड्या यांची गोलंदाजी त्यांनी यशस्वीरित्या खेळून काढत १३ षटकात ७७ धावांची सलामी दिली.

चहलने विणले फिरकीचे जाळे
श्रीलंकेचा सलामीवीरांनी शानदार सुरूवात केल्यानंतर भारतीय कर्णधार शिखर धवन याने संघाचा अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहल याला गोलंदाजीसाठी पाचारण केले. त्यानेही कर्णधाराला नाराज न करता आपल्या दुसऱ्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर ३६ धावांवर खेळत असलेल्या मिनोद भानुकाला मनीष पांडेच्या हाती झेल देण्यास भाग पाडले.

त्यानंतर, पुढील चेंडूवर आपला दुसरा सामना खेळणाऱ्या भानुका राजपक्षे याला अप्रतिम चेंडू टाकून चकवले. राजपक्षे याच्या बॅटची कड घेऊन उडालेला चेंडू यष्टीरक्षक इशान किशनने टिपला.

श्रीलंकेच्या डावाची घसरगुंडी
सलामीवीरांच्या शानदार सुरुवातीनंतर ही श्रीलंकेचा डाव अचानक गडगडला. चहलने चौदाव्या षटकात दोन गडी बाद झाल्यानंतर अविष्का फर्नांडो याने अर्धशतक साजरे केले. मात्र, तो भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर ५० धावा काढून माघारी परतला. अनुभवी धनंजय डी सिल्वा देखील ३२ धावांच्या पुढे जाऊ शकला नाही. पण असे असताना चरिथ असलंकाने एक बाजू सांभाळून ठेवली होती.

महत्त्वाच्या बातम्या – 

इंग्लंड दौऱ्यावर गेलेले ‘हे’ दोन भारतीय खेळाडू करतायेत आपल्याच संघाविरुद्ध दोन हात, पाहा तो अनोखा नजारा

सीएसके संघ ऑगस्ट महिन्यात करणार आयपीएलच्या तयारीला सुरुवात, ‘या’ शहरात लावणार कॅम्प

इंग्लंड दौऱ्यातील सराव सामन्यात दंडाला काळी पट्टी बांधून मैदानात उतरला भारतीय संघ, ‘हे’ आहे कारण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---