भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. सध्या सुरू असलेली पाच सामन्यांची टी२० मालिका संपल्यानंतर, भारताचे संपूर्ण लक्ष आशिया चषकावर असेल. त्याचबरोबर आशिया चषकामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची २०२२ च्या टी२० विश्वचषकासाठी संघात निवड होऊ शकते. मात्र, आशिया चषक सुरू होण्यापूर्वी भारतीय निवडकर्त्यांसमोर काही मोठे प्रश्न आहेत, जे निवडसमितीला स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सोडवावे लागतील. आशिया चषकासाठी काही अनुभवी खेळाडू संघात पुनरागमन करतील. तसेच त्यांच्या अनुपस्थितीत संधी मिळालेल्या युवा खेळाडूंनाही संघात निवडण्याचे आव्हान निवड समितीसमोर असणार आहे.
केएल राहुल-
आशिया चषकासाठी भारतीय संघात नियमित उपकर्णधार केएल राहुल करू शकतो. आयपीएलनंतर त्याने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. त्याच्या अनुपस्थितीत चांगली कामगिरी केलेल्या ईशान किशन याला संधी देणे की पुन्हा राहुलवर विश्वास दाखवणे निवड समितीला विचार करण्यास भाग पाडेल. तसेच राहुल पूर्ण तंदुरुस्त झाल्यानंतर पुन्हा एकदा त्याच फॉर्ममध्ये खेळेल का असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.
अर्शदीप सिंग-
युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने आपल्याला मिळालेल्या संधीत जगभरातील सर्व माजी खेळाडूंचे व समीक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. अशा परिस्थितीत त्याला आशिया चषक व टी२० विश्वचषकात संधी देत ‘सरप्राईज पॅकेज’ म्हणून वापरले जाऊ शकते. जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांच्या जोडीला एक डावखुरा वेगवान गोलंदाज संघाला नक्कीच मजबुती देऊ शकतो. त्याचवेळी मोहम्मद शमी व मागील अनेक दिवसांपासून चमकदार कामगिरी करणाऱ्या हर्षल पटेल यापैकी कोणाला संधी दिली जाणार हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरेल.
फिरकीपटू म्हणून कोणाला संधी?
सध्या युजवेंद्र चहल भारताचा पहिल्या पसंतीचा टी२० फिरकीपटू आहे. त्याचे विश्वचषकातील स्थान पक्के मानले जात आहे. मात्र, त्याच्या जोडीला अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला संधी मिळणार की रवी बिश्नोई व कुलदीप यादव यांच्यावर विश्वास ठेवला जाणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या-