19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीला आता फक्त एक महिना उरला आहे. ज्यामध्ये भारताचे सर्व सामने दुबईमध्ये खेळवले जाणार आहेत. टीम इंडियाचा पहिला सामना बांग्लादेशविरुद्ध 20 फेब्रुवारी रोजी खेळवला जाईल. सुरक्षेच्या कारणास्तव भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला आहे. जेव्हा निवड समिती सदस्य चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ निवडण्यासाठी बसतील तेव्हा त्यांना खूप विचार करावा लागणार आहे.
दुबईच्या संथ खेळपट्टीचा विचार करता, येथे फिरकीपटूंची भूमिका वाढू शकते. अशा परिस्थितीत, भारतीय निवड समिती तीन फिरकीपटूंना संघात समाविष्ट करू शकते. जर तीन नाही तर दोन फिरकी गोलंदाजांची निवड निश्चित आहे. रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांच्यात निवडीसाठी लढत आहे. परंतु अंतिम अकरामध्ये फक्त दोनच फिरकी गोलंदाज खेळतील.
नोव्हेंबर 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषक अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर, भारताने सहा एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये रवींद्र जडेजाला विश्रांती देण्यात आली आहे. असो, जडेजाचा फॉर्म पांढऱ्या चेंडूच्या स्वरूपात तितकासा चांगला राहिलेला नाही आणि सूत्रांचा असा विश्वास आहे की निवड समितीला एकदिवसीय सामन्यांमध्ये अक्षर पटेल हा एक चांगला पर्याय वाटतो. जडेजा आणि अक्षर दोघेही फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही माहिर आहेत.
दरम्यान, वॉशिंग्टन सुंदरची निवड निश्चित दिसतेय, पण निवडकर्ते कुलदीप यादवच्या तंदुरुस्तीवर लक्ष ठेवून आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या बेंगळुरू कसोटीदरम्यान कुलदीप यादवला दुखापत झाली होती. पण आता तो पूर्णपणे तंदुरुस्त दिसत आहे, पण विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने एकही सामना खेळला नाही. जर तो खेळला नाही तर रवी बिश्नोई किंवा वरुण चक्रवर्ती यांना संधी मिळू शकते.
चॅम्पियन्स ट्रॉफी संघात निवडीसाठी दावेदार: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती किंवा रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज. , अर्शदीप सिंग , आवेश खान किंवा मोहम्मद शमी, रिंकू सिंग किंवा तिलक वर्मा
हेही वाचा-
कांगारुंना मोठा धक्का! आगामी चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये कर्णधाराचा सहभाग अनिश्चित, भारताला दिलासा!!
‘रोहितसह जयस्वाल…’, क्रिकेट पंडित आकाश चोप्राने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपला संघ निवडला
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक हॅट्रिक घेणारे टॉप 3 संघ, यादीत भारताचा समावेश?