पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची सध्या अत्यंत खराब स्थिती दिसून येत आहे. मागील अनेक दिवसांपासून पीसीबी व भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय यांच्या दरम्यान वाद सुरू असल्याचा दिसतो. भारतीय संघाने आशिया चषकासाठी पाकिस्तानात येण्याचे नाकारल्यानंतर, पाकिस्तानने विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार, आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडून काढून श्रीलंकेला देण्यात येणार आहे. त्याचबरोबर आता पाकिस्तानकडून 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद देखील काढून घेण्यात येऊ शकते.
एका आघाडीच्य वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) 2025 चॅम्पियन ट्रॉफी पाकिस्तानत खेळवण्यासाठी इच्छुक नाही. भारतीय संघाने या स्पर्धेवर बहिष्कार टाकल्यास, स्पर्धेच्या बाजार मूल्यात घट येऊ शकते. त्यामुळे ही स्पर्धा वेस्ट इंडीज व अमेरिकेत आयोजित करण्याचा विचार सुरू झाला आहे. काही दिवसांपूर्वीच आयसीसी 2024 टी20 विश्वचषक वेस्ट इंडिज व अमेरिकेतून हलवून इंग्लंडला नेण्याच्या विचार करत असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळेच, आयसीसी त्याच्या बदल्यात या दोन्ही देशांना चॅम्पियन ट्रॉफीचे यजमानपद देऊ शकते.
पाकिस्तान मध्ये मागील अनेक वर्षांपासून कोणतीही आयसीसीची स्पर्धा झालेली नाही. 2011 वनडे विश्वचषकाचे ते सहयजमान होते. मात्र, 2009 मध्ये श्रीलंका संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांचे हे यजमानपद काढून घेण्यात आले होते. त्यानंतर जवळपास नऊ वर्ष पाकिस्तानात कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला नव्हता.
बातमी अपडेट होत आहे…
(Champions Trophy 2025 might be shifted from Pakistan to West Indies and the USA)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विक्रमवीर रोहित! 15 धावांवर बाद होऊनही रचला इतिहास, ICC Finalमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा एकटाच खेळाडू
नॉटआऊट असूनही रहाणेला पंचांनी दिले आऊट, मग मैदानात झालेला ड्रामा आख्ख्या जगाने पाहिला; Video