यंदाच्या टी20 विश्वचषकावर भारतीय संघाने नाव कोरले. परंतू आता चाहते आगामी चॅम्पियन्स ट्रॅफीची वाट पाहत आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी पुढच्या वर्षीच होणार असली तरी त्याची चर्चा आतापासूनच जोरदार सुरु आहे. चॅम्पियन्स ट्राॅफीचे यजमान पाकिस्तान आहे. पण भारतीय संघ चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी पाकिस्तानमध्ये जाऊ इच्छित नाही. त्यामुळे सध्या वाद सुरु आहेत.
दोन्ही देशांमध्ये सीमापार तणाव दीर्घकाळापासून सुरु असल्यामुळे भारताने पाकिस्तान संघासोबत कोणतीही मालिका खेळलेली नाही. दोन्ही संघ फक्त आयसीसी स्पर्धा किंवा आशिया कपमध्ये आमने-सामने येतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटचा सामना न्यूयॉर्कमध्ये टी20 विश्वचषकादरम्यान झाला होता. या सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली होती.
तत्पूर्वी पाकिस्तान सध्या चिंतेत आहे. कारण भारत आपला संघ चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी पाकिस्तानमध्ये पाठवू इच्छित नाही. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आता ते सहन करत नसल्याचे दिसत आहे. पीसीबीने भारतीय संघाच्या सहभागाबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) कठोर विधान केले आहे.
कोलंबो, श्रीलंका येथे झालेल्या आयसीसीच्या वार्षिक परिषदेत पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी (Mohsin Naqvi) यांनी 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या सहभागाबाबत कठोर भूमिका घेतली. वृत्तानुसार, वाढत्या तणावामुळे बीसीसीआयला पाकिस्तानमध्ये जाण्याची इच्छा नाही. परंतू, मोहसिन नक्वी मागे हटण्यासाठी तयार नाहीत, त्यांनी आयसीसीला भारतीय संघाला पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी आणण्याची जबाबदारी घेण्यास सांगितले आहे.
वृत्तानुसार, पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी (Mohsin Naqvi) यांनी आयसीसीला हे स्पष्ट सांगितले आहे की, “पाकिस्तान 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करेल. कोणतेही हायब्रीड मॉडेल असणार नाही. भारताला पाकिस्तानात आणण्याची जबाबदारी आयसीसीची आहे, पीसीबीची नाही.”
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिकेटच्या मैदानात चक्क कोल्होबाची एंट्री! सैरभैर धावून केलं प्रेक्षकांचं मनोरंजन, एकदा VIDEO पाहाच
“तू माझ्यासाठी सर्वकाही आहेस”, वाढदिवसानिमित्त बॉयफ्रेंडची स्मृती मंधानासाठी प्रेमळ पोस्ट
आयपीएल 2025च्या मेगा लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्स रिषभ पंतला सोडणार?