---Advertisement---

“तू माझ्यासाठी सर्वकाही आहेस”, वाढदिवसानिमित्त बॉयफ्रेंडची स्मृती मंधानासाठी प्रेमळ पोस्ट

On: शनिवार, जुलै 20, 2024 4:02 PM
palash muchhal, smriti mandhana
---Advertisement---

Smriti Mandhana Birthday :- भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिने 19 जुलै रोजी आपला 28 वा जन्मदिवस साजरा केला. नॅशनल क्रश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्मृतीला चाहते आणि अनेक सेलिब्रिटींनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, या सर्वांमध्ये तिचा बॉयफ्रेंड असलेल्या पलाश मुच्चल (Smriti Mandhana Boyfriend) याने आगळ्यावेगळ्या शुभेच्छा देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

स्मृतीच्या वाढदिवशी पलाश दोघांचे फोटो पोस्ट केले. यावर त्याने एक खास कॅप्शन देखील दिले. त्याने लिहिले, ‘वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा माय गर्ल. तू माझ्यासाठी सर्वकाही आहे. तुझ्याविना मी माझ्या आयुष्याचा विचार करू शकत नाही.’ यासोबतच त्याने हार्ट आणि इतर काही इमोजी देखील लावल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच या दोघांनी एक पोस्ट केली होती. यामध्ये आपल्या नात्याला पाच वर्ष झाल्या निमित्ताने त्यांनी केक कापून सेलिब्रेशन केले होते. पलाश हा प्रसिद्ध गायिका पलक मुच्चल हिचा भाऊ आहे. 29 वर्षे पलाश हा संगीतकार म्हणून आपली कारकीर्द तयार करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Palaash Muchhal (@palash_muchhal)

स्मृती सध्या जगातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून ओळखली जाते. काही महिन्यांपूर्वीच तिच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने डब्लूपीएल विजेतेपद जिंकले होते. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या तीनही प्रकारच्या मालिकांमध्ये तिने सर्वश्रेष्ठ कामगिरी केली होती. वनडे मालिकेत दोन शतके व एक 90 धावांची खेळी तिच्या बॅटमधून आलेली. त्यानंतर एकमेव कसोटीत शतक व टी20 मालिकेतही दमदार कामगिरी करून दाखवलेली. महिला आशिया चषकाच्या पहिल्या सामन्यात देखील तिने 40 धावांची खेळी केली. भारतीय संघाला महिला आशिया चषकाचे विजेतेपद राखायचे असल्यास, स्मृतीला शानदार कामगिरी करावी लागेल.

महत्त्वाच्या बातम्या-

गौतम गंभीरची इच्छा पूर्ण! टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये दाखल होणार केकेआरमधील साथीदार
‘आलीशान कार आणि घर, वर्षाला करोडो रुपयांची कमाई’, नव्या कर्णधाराची एकूण संपत्ती जाणून व्हालं थक्क!
‘हिम्मत असेल तर…’,मोहम्मद शमीने सानिया मिर्झासोबत लग्नाबाबतच्या अफलवांवर तोडले मौन 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---