आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची (ICC Champions Trophy 2025) क्रिकेटचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यंदा पाकिस्तानच्या यजमानपदाखाली पाकिस्तान आणि युएईमध्ये हायब्रिड मॉडेल अंतर्गत चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होईल. यंदा या मेगा स्पर्धेत भारतीय संघाची धुरा रोहित शर्माकडे (Rohit Sharma) असेल. रोहित शर्मा पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
या स्पर्धेच्या इतिहासात भारतासाठी अनेक कर्णधार झाले आहेत. ज्यामध्ये काही मोठी नावे देखील समाविष्ट आहेत. जिथे एकीकडे रोहित पहिल्यांदाच नेतृत्व करणार आहे. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण अशा 3 खेळाडूंबद्दल जाणून घेऊया, ज्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे.
1) सौरव गांगुली – 11 सामने- आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करण्याचा रेकाॅर्ड सौरव गांगुलीच्या नावावर आहे. माजी कर्णधार सौरव गांगुलीने 2000 ते 2004 या काळात चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचे नेतृत्व केले होते. दरम्यान त्याने एकूण 11 सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले. गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताने फक्त 2 सामने गमावले, 7 सामने जिंकले, तर 2 सामने अनिर्णीत राहिले.
2) महेंद्रसिंह धोनी – 8 सामने- भारताचा महान कर्णधार राहिलेला माजी दिग्गज कर्णधार महेंद्रसिंह धोनीला (Mahendra Singh Dhoni) कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्याने 2 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचे नेतृत्व केले. ज्यामध्ये तो 8 सामन्यांमध्ये कर्णधार होता. 2009 आणि 2013च्या स्पर्धेत धोनीने भारताचे नेतृत्व केले. ज्यामध्ये त्याने 6 सामने जिंकले, तर केवळ 1 सामना गमावला.
3) विराट कोहली – 5 सामने- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) महेंद्रसिंह धोनीनंतर भारतीय संघाची धुरा सांभाळी. त्याने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भारताचे नेतृत्व केले आहे. 2017च्या चॅम्पियन ट्राॅफीमध्ये विराटने भारताचे नेतृत्व केले. त्याने 5 सामन्यांत भारताचे नेतृत्व केले. तो सर्वाधिक सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करणारा तिसरा कर्णधार आहे. दरम्यान त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 3 सामने जिंकले.
महत्त्वाच्या बातम्या-
Champions Trophy; भारत-पाकिस्तान सोडून सर्व संघांची घोषणा, जाणून घ्या 6 संघांचे स्क्वाड
माजी दिग्गजाने सांगितली विराटला फाॅर्ममध्ये आणण्याची ट्रिक! म्हणाला, “त्याला सांगा पाकिस्तानविरूद्ध…”
पंजाबच्या कर्णधाराची घोषणा झाली, आता RCB-KKR बाकी! पाहा कर्णधारांची यादी