आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या (ICC Champions Trophy 2025) क्रेझने सध्या जागतिक क्रिकेटला वेडे केले आहे. ही मेगा स्पर्धा (19 फेब्रुवारी) पासून पाकिस्तानच्या यजमानपदाखाली खेळली जाईल. भारतीय संघ आपले सर्व सामने दुबईच्या मैदानावर खेळणार आहे. दरम्यान भारताचे स्टार खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पूर्णपणे सज्ज झाले आहेत, ज्यामध्ये सर्वांच्या नजरा रेकॉर्ड ‘किंग’ विराट कोहलीवर (Virat Kohli) आहेत.
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) सध्या फारसा फॉर्ममध्ये नाही. पण चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात कोहलीने खूप प्रभावी कामगिरी केली आहे. या मेगा स्पर्धेत किंग कोहलीने खेळलेल्या सामन्यांची संख्या आणि त्याचा जवळचा मित्र एबी डिव्हिलियर्सनेही (AB De Villiers) तेवढेच सामने खेळले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या या माजी दिग्गज खेळाडूने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोहलीच्या बरोबरीने 13 सामने खेळले आहेत.
अशा परिस्थितीत, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही दिग्गज फलंदाजांची तुलना योग्य आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोहली आणि डिव्हिलियर्सचा प्रवास पाहण्यासारखा असेल. या बातमीद्वारे आपण या दोन्ही दिग्गज खेळाडूंची चॅम्पियन्स ट्राॅफीतील आकडेवारीबद्दल जाणून घेऊया.
गेल्या दीड दशकापासून भारतीय क्रिकेट संघासाठी सर्वात मोठी रन मशीन असलेला विराट गेल्या अनेक वर्षांपासून चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळत आहे. किंग कोहली पहिल्यांदा 2009च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये या स्पर्धेत खेळला होता. तेव्हापासून आतापर्यंत म्हणजेच 2017 पर्यंत तो एकूण 13 सामने खेळण्यात यशस्वी झाला आहे. या काळात, त्याने 13 सामन्याlतील 12 डावात फलंदाजी करताना 88.16च्या सरासरीने 529 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने 5 अर्धशतके झळकावली आहेत. कोहलीची सर्वोच्च धावसंख्या 96 आहे.
दक्षिण आफ्रिकेचा माजी महान फलंदाज एबी डिव्हिलियर्सचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप मोठा दर्जा आहे. मिस्टर 360 डिग्री या नावाने प्रसिद्ध असलेल्या या दिग्गज फलंदाजाने 2006 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपला प्रवास सुरू केला. यानंतर, तो 2017 पर्यंत या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करत राहिला. या स्पर्धेत त्याने 13 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 13 डावांमध्ये 33.16च्या सरासरीने 398 धावा केल्या आहेत.
एबी डिव्हिलियर्सने चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये 3 अर्धशतके झळकावली आहेत. पण चॅम्पियन्स ट्रॉफीमधील कोहलीच्या आकडेवारीपेक्षा डिव्हिलियर्स खूपच मागे असल्याचे दिसते.
महत्त्वाच्या बातम्या-
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत विरुद्ध बांग्लादेश मोठी लढत, प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळणार?
कोहलीच्या ‘जुगाड’ने बीसीसीआयच्या नव्या नियमांचे केले उल्लंघन? जाणून घ्या प्रकरण
क्रिकेटच्या मैदानात महान खेळाडूचे पुनरागमन, जाणून घ्या केव्हा आणि कोणत्या संघासाठी खेळणार