---Advertisement---

कोहलीच्या ‘जुगाड’ने बीसीसीआयच्या नव्या नियमांचे केले उल्लंघन? जाणून घ्या प्रकरण

---Advertisement---

अलिकडेच झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये (Border Gavaskar Trophy 2024-25) ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाच्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अनेक नियम बदलले आहेत. बीसीसीआयने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार, भारतीय संघातील खेळाडू विदेशी दौऱ्यावर त्यांच्यासोबत वैयक्तिक कर्मचारी घेऊ शकत नाहीत.

सध्या भारतीय खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी (ICC Champions Trophy 2025) दुबईमध्ये आहेत. दरम्यान विराट कोहलीचा (Virat Kohli) स्वतःचा वैयक्तिक स्वयंपाकी नसला तरी, त्याने दुबईमध्ये त्याचे आवडते जेवण खाण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, भारतीय संघ सरावासाठी मैदानावर आल्यानंतर काही वेळातच कोहलीच्या नावाने एक अन्नाचे पॅकेट पोहोचवण्यात आले. बीसीसीआयने वैयक्तिक शेफ आणि इतर गोष्टींवर बंदी घातली असली तरी, अहवालात असे म्हटले आहे की कोहलीने संघ व्यवस्थापकासमोर त्याची मागणी मांडली जी पूर्णही झाली. कोहलीसाठी जवळच्या एका लोकप्रिय खाद्यपदार्थाच्या दुकानातून जेवण मागवण्यात आले होते.

जेवण अनेक बॉक्समध्ये पॅक केले होते, जे कोहली सराव सत्र संपल्यानंतर खाणार होता. इतर खेळाडू त्यांच्या किट बॅग्ज पॅक करत असताना, कोहली जेवण खात होता. त्याने प्रवासासाठी एक बॉक्सही जपून ठेवला होता.

बीसीसीआयच्या 10 कलमी धोरणात एक नियम जोडण्यात आला आहे की, भारतीय संघाचा कोणताही खेळाडू त्याच्यासोबत वैयक्तिक कर्मचारी ठेवू शकत नाही. कोणताही खेळाडू आपल्यासोबत स्वयंपाकी, सुरक्षा रक्षक किंवा कोणत्याही प्रकारचा सहाय्यक घेऊ शकत नाही. बीसीसीआय या नियमांबद्दल इतके गंभीर आहे की मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसोबत असलेल्या वैयक्तिक सहाय्यकाला दुसऱ्या हॉटेलमध्ये राहण्यास सांगण्यात आले आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी

महत्त्वाच्या बातम्या-

क्रिकेटच्या मैदानात महान खेळाडूचे पुनरागमन, जाणून घ्या केव्हा आणि कोणत्या संघासाठी खेळणार
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात भारताची संभाव्य प्लेइंग 11, या खेळाडूंना मिळणार संधी!
क्रिकेटपटू जहीर खानची नवी घरखरेदी, किंमत ऐकून तुमच्याही भुवया उंचावतील!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---