नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिका (south africa) दौऱ्यात भारतीय संघाला कसोटी सोबतच एकदिवसीय मालिका सुद्धा गमवावी लागली होती. आता भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज (west indies) सोबत ६ फेब्रुवारीपासुन ३ सामन्यांची एकदिवसीय आणि ३ सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. तसेच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पुढील एका वर्षात २ विश्वचषक खेळणार आहे. वेस्ट इंडीजविरुद्धची मालिका सुरु होण्यापुर्वीच भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर (sunil gavaskar) यांनी भुवनेश्वर कुमारच्या संघातील स्थानावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
गावसकरांनी भुवीबद्दल बोलताना म्हटलं आहे की, “भुवनेश्वर कुमारची मला काळजी वाटत आहे. तो आता पुर्वीचा भुवी राहिलेला नाही. आता संघात त्याचे भवितव्य काय असेल? हे ही मला माहित नाही. त्याने आपली धार आणि वेग दोन्ही गमावला आहे. तो ज्या पद्धतीची गोलंदाजी करत आहे ते पुर्णपणे निराशाजनक आहे. त्याला परत जाउन बेसिक गोष्टी शिकाव्या लागणार आहेत.”
गावसकरांचे असे म्हणणे आहे की, “आता भारतीय संघात दीपक चहरला जास्त संधी द्यायला हवी. कारण, तो भुवनेश्वर सारखा गोलंदाज असून तो दोन्ही बाजूने चेंडू स्विंग करु शकतो आणि तो उत्तम फलंदाजीही करु शकतो. भुवीनेही चांगली कामगीरी केली आहे. पण गेल्या एक दोन वर्षात तो अत्यंत महागडा ठरला आहे. तसेच त्याने त्याची धारही गमावली आहे.”
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत भुवनेश्वर कुमार पुनरागमन करत चांगली कामगीरी करेल असे वाटले होते. मात्र, तो काही खास कामगिरी करु शकला नाही. त्याने पहिल्या एकदिवसीय मालिकेत ६४ धावा देत एकही विकेट घेतली नाही. तर दुसऱ्या सामन्यात ६७ धावा देत त्याला एकही बळी मिळवता आला नाही. या कारणामुळेच वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याला स्थान देण्यात आले नाही.
भारतीय संघाला या वर्षात टी२० विश्वचषक खेळायचा आहे. तसेच पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला एकदिवसीय विश्वचषक सुद्धा खेळायचा आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला यासाठी तयार रहावे लागणार आहे. त्यातच दिग्गज खेळाडूच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
वेस्ट इंडीजविरुद्ध भारतीय संघ
एकदिवसीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार),के एल राहुल (उपकर्णधार),विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, दीपक हुड्डा, आवेश खान, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, रिषभ पंत, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, दीपक चहर, मोहम्मद सिराज, रवी बिश्नोई, शार्दुल ठाकूर, शिखर धवन, वाॅशिंग्टन सुंदर.
टी२० संघ
रोहित शर्मा (कर्णधार), के एल राहुल (उपकर्णधार),विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, वाॅशिंग्टन सुंदर, दीपक चहर, मोहम्मद सिराज, रवी बिश्नोई, शार्दुल ठाकूर, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार आणि इशान किशन.
महत्वाच्या बातम्या-
‘या’ कारणामूळे स्टार्कने घेतली मेगा लिलावातून माघार; म्हणाला… (mahasports.in)
लखनऊ सुपरजायंट्सच्या लोगोची रंजक कहाणी; पुराणातील दाखले आणि आधुनिकतेचा साज (mahasports.in)
“‘माझी धोनीबद्दल नाही, तर बीसीसीआयबद्दल तक्रार आहे” (mahasports.in)