---Advertisement---

‘हा’ नियम बदला! ऑस्ट्रेलियाच्या मुख्य प्रशिक्षकाची आयसीसीकडे मागणी; काय आहे कारण?

On: बुधवार, जुलै 29, 2026 9:04 PM
---Advertisement---

आगामी वर्ल्डकप 2027 स्पर्धेचा थरार दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि झिम्बाब्वेत रंगणार आहे. ही स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सर्व संघांनी या स्पर्धेची तयारी करायला सुरुवात केली आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी अलीकडेच, भारतीय खेळाडूंच्या तयारीसाठी भारतातील मैदानांवरील बाऊंड्री साईज वाढवण्याचा सल्ला दिला होता. आता ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक अँड्रयू मॅक्डोनाल्ड यांनी आयसीसीकडे खास विनंती केली आहे. अँड्रयू मॅक्डोनाल्ड यांनी वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी संघातील खेळाडूंची संख्या वाढवण्याची विनंती केली आहे.

आगामी वनडे वर्ल्डकप स्पर्धेत एकूण 14 संघ सहभाग घेणार आहेत. हा वर्ल्डकप 3 देशांमध्ये खेळवला जाणार आहे. आयसीसीने काही दिवसांपूर्वीच नव्या नियमांची घोषणा केली आहे. जे आगामी वर्ल्डकप स्पर्धेत लागू केले जाणार आहेत. त्याआधी अँड्रयू मॅक्डोनाल्ड यांनी वर्ल्डकप स्क्वॉडमधील सदस्यांची संख्या वाढवण्याची विनंती केली आहे. कुठल्याही स्पर्धेसाठी 15 सदस्यांच्या स्क्वॉडची घोषणा केली जाते. पण अँड्रयू मॅक्डोनाल्ड यांनी अशी मागणी केली आहे की, आयसीसीने स्क्वॉडमधील सदस्यांची संख्या 15 ऐवजी 17 करावी. यामागचं एकमेव कारण म्हणजे, ऑस्ट्रेलियाचे बरेचशे स्टार खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे अतिरिक्त खेळाडूंचा पर्याय उपलब्ध असावा म्हणून त्यांनी ही मागणी केली आहे.

एमईएन रेडियोला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अँड्रयू मॅक्डोनाल्ड म्हणाले, “वर्ल्डकप स्पर्धा ही क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे स्क्वॉड किती मोठा असावा, यावर विचार करणे गरजेचे आहे.” अँड्रयू मॅक्डोनाल्ड यांनी 2023 वनडे वर्ल्डकप स्पर्धेचे उदाहरण दिले. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला पराभूत करुन जेतेपदाचा मान पटकावला होता. या स्पर्धेसाठीही 15 खेळाडूंच्या स्क्वॉडची परवानगी देण्यात आली होती. अँड्रयू मॅक्डोनाल्ड यांच्या मते, 15 खेळाडूंच्या संघात जर खेळाडूंना दुखापत झाली, तर मोठ्या अडचणी निर्माण होतात. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये जर 2-3 खेळाडूंना दुखापत झाली, तर पुढील सामन्यांसाठी 12-13 खेळाडूंमधून निवड करावी लागते. वेगवेगळ्या देशांमध्ये परिस्थिती बदलते, त्यामुळे योग्य समतोल साधणे कठीण जाते. 2023 मध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंडच्या संघाला देखील अशाच समस्येला सामोरं जावं लागलं होतं.

ऑस्ट्रेलियाचा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बलाढ्य संघांपैकी एक आहे. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियाचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. पण ऑस्ट्रेलियन संघालाही खेळाडूंच्या दुखापतीचा सामना करावा लागला आहे. 2023 वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील सुरुवातीलाच ट्रॅव्हिस हेड दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तो साखळी फेरीतील सामने खेळू शकला नव्हता. पण ऑस्ट्रेलियाने त्याच्या रिप्लेसमेंटची मागणी केली नव्हती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 14 खेळाडूंमधून 11 खेळाडूंची निवड करावी लागली. त्यानंतर तो फिट होऊन संघात परतला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---