बांगलादेशविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानला दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं. यानंतर आता संघामध्ये बदल करण्यात आले आहेत. बांगलादेशनं पहिल्या कसोटीत पाकिस्तानचा 10 गडी राखूव पराभव केला होता.
पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना रावळपिंडी येथे 30 ऑगस्टपासून खेळला जाईल. त्यापूर्वी पाकिस्ताननं अबरार अहमद आणि कामरान गुलाम यांना टीममध्ये संधी दिली आहे. अबरार हा घातक गोलंदाज आहे, तर कामरान अष्टपैलू खेळाडूची भूमिका निभावतो. या दोघांशिवाय गोलंदाजी अष्टपैलू आमिर जमाललाही संघात स्थान मिळालं आहे. मात्र त्याचा फिटनेस पाहूनच पुढील निर्णय घेतला जाईल.
कामरानबद्दल सांगायचं झालं तर, त्यानं पाकिस्तानसाठी अद्याप एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. मात्र त्यानं 59 प्रथम श्रेणी सामने खेळले, ज्यामध्ये त्याची कामगिरी शानदार राहिली आहे. कामराननं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 4377 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्यानं 16 शतकं आणि 20 अर्धशतकं ठोकली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यानं 28 विकेट्सही घेतल्या आहेत.
अबरारबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं पाकिस्तानसाठी 6 कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये त्यानं 38 विकेट्स घेतल्या आहेत. अबरारनं पाकिस्तानसाठी 3 टी20 सामनेही खेळले, ज्यामध्ये त्याच्यानावे 2 बळी आहेत. आता तो बांगलादेशविरुद्धच्या रावळपिंडी कसोटीत खेळताना दिसेल. अबरारनं 23 प्रथम श्रेणी सामन्यात 125 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय त्यानं 12 लिस्ट ए मॅचमध्ये 17 विकेट घेतल्या आहेत.
या दोघांच्या समावेशानं पाकिस्तानची टीम मजबूत तर झाली आहे, मात्र याचा परिणाम दुसऱ्या कसोटी सामन्याच्या परिणामावर होतो की नाही, हे पाहणं उत्सुकतेचं असेल.
हेही वाचा –
केएल राहुलला कर्णधारपदी कायम ठेवणं लखनऊसाठी ‘फायद्याचा सौदा’! कसं ते समजून घ्या
लखनऊचा मेंटॉर बनताच झहीर खानची भाषा बदलली, इम्पॅक्ट प्लेअर नियमावर केलं सडेतोड वक्तव्य
आयपीएल 2025 मध्ये राहुल लखनऊकडूनच खेळणार? मालक संजीव गोयंका यांच्या या वक्तव्यानं चर्चांना उधाण