---Advertisement---

IND vs NZ: पराभवानंतर टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार बदल! संजूच्या जागी संघात परतणार ‘हा’ खेळाडू

On: शुक्रवार, जानेवारी 30, 2026 8:24 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या चौथ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात मिळालेल्या पराभवानंतर पाचव्या आणि शेवटच्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल पाहायला मिळू शकतात (T20 series IND vs NZ).

वाईझॅगमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय फलंदाज मालिकेत पहिल्यांदाच फ्लॉप ठरले होते आणि 216 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संपूर्ण संघ 165 धावांवर ढेपाळला होता.

टी-20 वर्ल्ड कप 2026 पूर्वी टीम (ICC T-20 International world cup 2026) इंडियाचा (Team india) हा शेवटचा सामना असेल. पाचव्या टी-20 मध्ये सलग चार सामन्यांत फ्लॉप ठरलेल्या संजू सॅमसनला (Sanju Samson) प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. टीम इंडिया संजूच्या जागी ईशान किशनला (Ishaan kishan) सलामीवीर म्हणून आजमावू शकते. तसेच, जर अक्षर पटेल ((Axar Patel) तंदुरुस्त असेल, तर त्याचे पुनरागमन देखील होऊ शकते. अक्षर जर संघात परतला, तर हर्षित राणाला (Harshit Rana) बाहेर बसावे लागू शकते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---