भारतीय संघाचा अनुभवी खेळाडू रॉबिन उथप्पा किती प्रतिभावंत खेळाडू आहे, हे क्रिकेटप्रेमींना नव्याने सांगण्याची गरज नाही. जेव्हा जेव्हा तो भारतीय संघासाठी खेळला, त्यावेळी त्याने चाहत्यांची मने जिंकली. आपल्या बेफिकीर व आक्रमक फलंदाजीने त्याने अनेक चाहते कमावले होते. मात्र, कारकिर्दीच्या चांगल्या सुरुवातीनंतर ही तो भारतासाठी जास्त काळ खेळू शकला नाही. आयपीएल २०२१ स्थगित झाल्यानंतर उथप्पा सोशल मीडियावर चांगला सक्रिय आहे. नुकतेच एका चर्चेदरम्यान त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले. आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द जास्त दूर जाऊ शकली नाही, याचे देखील त्याने कारण सांगितले.
या कारणाने कारकीर्द लांबली नाही
युट्युबवरील चर्चेदरम्यान उथप्पाने अनेक खुलासे केले. उथप्पा म्हणाला, “वारंवार माझ्या फलंदाजीचा क्रम बदलल्यामुळे माझ्या फलंदाजीवर काहीसा परिणाम झाला. याच कारणाने माझी आंतरराष्ट्रीय कारकीर्द तितकीशी दूर गेली नाही. मला एकाच क्रमांकावर फलंदाजी संधी दिली गेली असती, तर कदाचित माझी कारकीर्द वेगळी असती. तुम्ही नीट अभ्यास केला तर मी एकाच क्रमांकावर तीन पेक्षा अधिक सामने खेळू नाही. मला एकाच स्थानी संधी दिली गेली असती तर, मी ४६ च्या ऐवजी १४९ किंवा २४९ सामने भारतासाठी खेळलो असतो.”
उथप्पाने भारतासाठी विविध क्रमांकावर फलंदाजीची जबाबदारी सांभाळली. पहिल्या १४ सामन्यात तो सलामीवीर होता. त्यानंतर त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली. त्यानंतर त्याने पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर देखील फलंदाजी केली.
अशी राहिली उथप्पाची कारकीर्द
रॉबिन उथप्पाने भारतासाठी १३ टी२० व ४६ वनडे सामने खेळले. यामध्ये त्याची सरासरी २५ पेक्षा कमी राहिली. जी त्याच्या प्रतिभेशी मिळती जुळती नाही. केवळ विसाव्या वर्षी त्याने भारतासाठी पदार्पण करताना ९६ चेंडूमध्ये ८६ धावांची खेळी केली होती. मात्र, त्यानंतर त्याच्याकडून एकही संस्मरणीय खेळी आली नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
क्रिकेटर नसता तर ‘या’ क्षेत्रात कमावले असते सूर्यकुमारने नाव, स्वतः केला खुलासा
‘हा’ असेल वेस्ट इंडिजचा भविष्यातील कर्णधार, पोलार्डने केला खुलासा
‘जेव्हा मी अफगाणिस्तानचा प्रशिक्षक झालो, तेव्हा लोकांनी माझी चेष्टा केली’