गेल्या काही वर्षात अफगाणिस्तान क्रिकेट संघाने चांगली प्रगती केली आहे. हा संघ एक उत्तम संघ म्हणून सर्वांसमोर आता येत आहे. या संघाच्या प्रगतीमध्ये एका भारतीय क्रिकेटपटूचाही वाटा आहे. तो भारतीय क्रिकेटपटू म्हणजे लालचंद राजपूत. त्यांनी या संघाचे प्रशिक्षणपद सांभाळले आहे. नुकतीच त्यांनी त्यांच्या या भूमिकेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
लालचंद राजपूत यांच्या मते, जेव्हा त्यांनी अफगाणिस्थान चे प्रशिक्षक होण्याचे ठरवले, तेव्हा अनेकांनी त्यांची चेष्टा उडवली.
क्रिकेट नेक्स्टशी बोलताना ते म्हणाले, ‘अफगाणिस्तानात काम करणे खूप चांगले आहे. कारण बहुतेक खेळाडूंना हिंदी भाषा येते. त्यामुळे त्यांना शिकवणे सोपे जाते. कारण हे युद्धक्षेत्र आहे आणि म्हणूनच खेळाडू त्यांच्या खेळावर खूप मेहनत घेत असतात. जेव्हा खेळाडू इतकी मेहनत घेतात, तेव्हा त्यांना प्रशिक्षण देण्यात आनंद वाटतो. एक संघ म्हणून आम्हाला खूपच यश मिळाले आणि कसोटी संघात दर्जाही मिळाला.’
ते पुढे म्हणाले, ‘जेव्हा मी अफगाणिस्तानची ऑफर स्वीकारली. तेव्हा बरेच लोक माझ्यावर हसले पण मी ते आव्हान म्हणून पाहिले. अफगाणिस्थानसमवेत माझ्या कार्यकाळात मी खूप मेहनत घेतली. कारण अफगाणिस्थान या विश्व क्रिकेटमधील सर्वोत्तम संघांपैकी एक असू शकतो, हे सिद्ध करण्याची माझी इच्छा होती. आम्ही कसोटी संघाचा दर्जा मिळवून हे साध्य केले. यांच्याव्यतिरिक्त राशिद खान, मोहम्मद नबी यांसारखे खेळाडू होते आणि मुजीव जादरान सारख्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ओळख मिळवली.’
लालचंद्र राजपूत हे 2016 मध्ये अफगाणिस्थान संघाचे प्रशिक्षक होते. त्यांनी एका वर्षापेक्षा अधिक काळ संघाला प्रशिक्षण देण्यासाठी घालवला. त्यांनी झिम्बाब्वेचे देखील प्रमुख प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. 2007 मध्ये जेव्हा भारतीय संघ टी20 विश्वविजेता झाला, तेव्हा लालचंद राजपूत भारतीय संघाचे व्यवस्थापक होते.
महत्त्वाच्या बातम्या –
पायाचा अंगठा फ्रॅक्चर असतानाही कशी केली होती गोलंदाजी, नील वॅगनरने केला खुलासा
केएल राहुलसोबत डान्स करत असलेली मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण? घ्या जाणून
‘स्पिनर आणि स्किपरसह!’ धनश्री वर्माने शेअर केला फ्लॅशबॅक फोटो