---Advertisement---

केएल राहुलसोबत डान्स करत असलेली मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण? घ्या जाणून 

On: शनिवार, मे 22, 2021 10:46 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा भरवशाचा खेळाडू केएल राहुल सध्या इंग्लंड दौर्‍याच्या तयारीत गुंतलेला आहे. आपल्या आजारपणातून तो पूर्णतः बरा झाला असून आगामी 24 मे रोजी मुंबईत तो भारतीय संघाच्या बायो बबलमध्ये सामील होईल. सध्या राहुलचा एक व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो एका मुलीबरोबर मस्ती करताना दिसला आहे. राहुलचा हा व्हिडिओ पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत, कारण या व्हिडिओमधील मुलगी त्याची कथित गर्लफ्रेंड अथिया शेट्टी नसून इतर कोणीतरी आहे.

केएल राहुलच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, तो एका मुलीबरोबर डान्स करत आहे. या व्हिडिओमध्ये तो ब्राझिलियन कलाकार बोंडे आर 300 च्या ‘ओ नानाना’ गाण्यावर डान्स करत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. कारण ही मुलगी राहुलची कथित प्रेयसी अथिया शेट्टी नाही. तर राहुलसोबत व्हिडिओमध्ये असलेल्या मुलीचे नाव सांची गिलानी आहे .

सांची गिलानी ही एक फॅशन स्टायलिस्ट आणि क्युरेटर आहे. सांची ही राहुलची गर्लफ्रेंड अथियाची जवळची मैत्रीण आहे. दोघांना बर्‍याच वेळा एकत्र पाहिले गेले आहेत. अथिया आणि सांचीच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये दोघेही बर्‍याचदा एकत्र दिसतात.

https://www.instagram.com/p/COQLY13gq_V/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, राहुलबद्दल विचार केला असता त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी असून तो दुखापतीतून सावरत आहे आणि आगामी काळात भारतीय संघासह इंग्लंडला रवाना होण्यास सज्ज आहे.

भारतीय संघ आगमी काळात इंग्लंड येथे 18 ते 22 जून दरम्यान जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ ऑगस्ट- सप्टेंबर मध्ये इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की राहुलला भारताच्या अंतिम 11 मध्ये संधी मिळते अथवा नाही.

महत्त्वाच्या बातम्या – 

टेस्ट चॅम्पियनशीप: सर्वाधिक विकेट्स आणि सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये फक्त ‘या’ धुरंधरांचीच हवा; पाहा खास आकडेवारी

“हे तुमच्याच बॉसविरुद्ध गोल्फ खेळण्यासारखे”, कसोटी अजिंक्यपदाच्या फायनलपूर्वी दिग्गजाचा न्यूझीलंडला सावधगिरीचा इशारा

असे ३ भारतीय खेळाडू ज्यांना कधीही मिळू शकणार नाही टीम इंडियाचे कर्णधारपद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---