---Advertisement---

टेस्ट चॅम्पियनशीप: सर्वाधिक विकेट्स आणि सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये फक्त ‘या’ धुरंधरांचीच हवा; पाहा खास आकडेवारी

---Advertisement---

भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या इंग्लंड दौऱ्यात पहिले आव्हान आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम सामन्याचे आहे. हा अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात होणार आहे. हा सामना साऊथॅम्पटनमध्ये १८ ते २२ जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे.

ही स्पर्धा १ ऑगस्ट २०१९ रोजी ऍशेस मालिकेने सुरु झाली होती. त्यानंतर न्यूझीलंड आणि भारत संघाने अनेक बलाढ्य संघाला मागे टाकत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. आता या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत.

न्यूझीलंडचा संघ इंग्लंडला पोहचला आहे. त्यांना या सामन्यापूर्वी इंग्लंडविरुद्ध २ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. तर भारतीय संघ जूनच्या पहिल्या आठवड्यात इंग्लंडला पोहचेल. या सामन्यासाठी २० जणांच्या भारतीय संघाची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली आहे. याच सामन्याच्या निमित्ताने काही खास आकडेवारीवर नजर टाकू.

कसोटी चॅम्पियनशीपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणार गोलंदाज
70 –  पॅट कमिन्स, ऑस्ट्रेलिया
69 –  स्टूअर्स ब्रॉड, इंग्लंड
67 – रविचंद्रन अश्विन, भारत
56 – नॅथन लायन, ऑस्ट्रेलिया
51 – टीम साऊदी, न्यूझीलंड

कसोटी चॅम्पियनशीपमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
1675 – मार्नस लॅब्यूशेन, ऑस्ट्रेलिया
1660- जो रुट, इंग्लंड
1341- स्टिव्ह स्मिथ, ऑस्ट्रेलिया
1334 – बेन स्टोक्स, इंग्लंड
1095 – अजिंक्य रहाणे, भारत
1030 – रोहित शर्मा, भारत

कसोटी चॅम्पियनशीपमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय खेळाडू
1095 अजिंक्य रहाणे
1030 रोहित शर्मा
877 विराट कोहली
857 मयंक अग्रवाल
818 चेतेश्वर पुजारा

कसोटी चॅम्पियनशीपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणार भारतीय गोलंदाज 
67 – रविचंद्रन अश्विन
36 – इशांत शर्मा
36 – मोहम्मद शमी
34 – जसप्रीत बुमराह
29 – उमेश यादव

कसोटी चॅम्पियनशीपमध्ये सर्वाधिक धावा करणारे न्यूझीलंडचे फलंदाज
817 – केन विलियम्सन
680 – टॉम लॅथम
585 – हेन्री निकोल्स
469 – रॉस टेलर
417 – बीजे वॉटलिंग

कसोटी चॅम्पियनशीपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणार न्यूझीलंडचे गोलंदाज 
51 – टीम साऊदी
36 – काईल जेमिसन
34 – ट्रेंट बोल्ट
32 – नील वॅगनर
11 – कॉलिन डी ग्रँडहोम

इंग्लंडमध्ये जिंकण्याच्या टक्केवारीत भारत सातव्या क्रमांकावर
42.3 इंग्लंड
34.8 विंडीज
30.7 ऑस्ट्रेलिया
22.4 पाकिस्तान
19.7 साऊथ आफ्रिका
16.7 श्रीलंका
11.3 भारत
9.3 न्यूझीलंड

महत्त्वाच्या बातम्या – 

“हे तुमच्याच बॉसविरुद्ध गोल्फ खेळण्यासारखे”, कसोटी अजिंक्यपदाच्या फायनलपूर्वी दिग्गजाचा न्यूझीलंडला सावधगिरीचा इशारा

असे ३ भारतीय खेळाडू ज्यांना कधीही मिळू शकणार नाही टीम इंडियाचे कर्णधारपद

विस्डेनने निवडला सर्वकालीन भारतीय कसोटी संघ; सेहवाग-धोनीला डच्चू, तर ‘हा’ खेळाडू असेल कर्णधार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---