यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीचा (ICC Champions Trophy 2025) फायनल सामना (9 मार्च) रोजी रंगणार आहे. या सामन्यासाठी भारत आणि न्यूझीलंड संघ आमने-सामने असतील. (India vs New Zealand Final) दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर या दोन्ही संघातील अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचंच लक्ष वेधले आहे. यादरम्यान (AI) ने लावलेल्या अंदाजानुसार फायनलमध्ये कोणत्या संघाचे पारडे जड आहे? याबद्दल आपण जाणून घेऊया. (Chat GPT and DeepSeek have revealed who will win the final)
चॅट जीपीटी (Chat GPT) आणि डीपसीक (DeepSeek) यांनी भारत आणि न्यूझीलंड संघाच्या विजयाच्या टक्केवारीबद्दल अंदाज वर्तवला आहे. दोघांनीही लावलेल्या अंदाजानुसार यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीच्या फायनलमध्ये भारतीय संघाचे पारडे जड आहे.
चॅट जीपीटीने चॅम्पियन्स ट्राॅफीच्या फायनलसाठी भारत आणि न्यूझीलंड संघाबद्दल जो अंदाज वर्तवला, त्यामध्ये भारतीय संघाच्या विजयाची टक्केवारी 55% आहे, तर न्यूझीलंडची विजयी टक्केवारी 45% आहे आणि डीपसीकने वर्तवलेल्या अंदाजानुसार भारताच्या विजयाची टक्केवारी 60% आहे, तर न्यूझीलंडची विजयी टक्केवारी 40% आहे.
View this post on Instagram
भारत-न्यूझीलंड संघाच्या वनडे क्रिकेटमधील हेड टू हेड रेकाॅर्डबद्दल बोलायचे झाल्यास, वनडे क्रिकेटमध्ये दोन्ही संघ 119 वेळा आमने-सामने आले आहेत. त्यामध्ये भारताचे वर्चस्व राहिले. भारताने 61 सामन्यात मिळवला, तर न्यूझीलंडने 50 सामन्यात विजय मिळवला आहे. दरम्यान भारताने 50 सामने गमावले, तर न्यूझीलंडला 61 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. दोन्ही संघातील 7 सामने अनिर्णित राहिले आहेत, तर 1 सामना बरोबरीत सुटला. (India vs New Zealand Head to Head Records In ODI)
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित शर्माच्या आठवणींना तडा! जिथे क्रिकेट शिकला ते मैदान जमीनदोस्त
बापरे! चॅम्पियन्स ट्रॉफीमधील या मॅचने तोडले सगळे ऑनलाईन विक्रम, तब्बल एवढ्या…
भारताचा शेवटचा चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल सामना कोणाविरुद्ध? जाणून घ्या निकाल






