इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल यांच्याकडून तब्बल आठ वर्षानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा घेण्यात येत आहे. यंदाच्या वर्षीचं स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे. तत्पूर्वी भारतीय संघ आपले सगळे सामने दुबईच्या स्टेडियमवर खेळणार आहे. तसेच आता जाणून घ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे सगळे सामने तुम्ही कसे लाईव्ह पाहू शकता, आणि भारतामध्ये किती वाजता सुरू होतील.
2025 चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात बुधवार 19 फेब्रुवारी रोजी होत आहे. स्पर्धेचा पहिला सामना यजमान संघ पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड दोन्ही संघात खेळला जाईल. भारतीय संघ बांगलादेश विरुद्ध सामना खेळून आपल्या स्पर्धेला सुरुवात करेल. भारत विरुद्ध बांगलादेश दोन्ही संघात 20 फेब्रुवारी रोजी सामना खेळला जाणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 9 मार्च रोजी खेळला जाणार आहे.
2025 चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता सुरू होतील. तसेच सामन्याचा टॉस 2 वाजता होईल. चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने तुम्ही टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेल वरती लाईव्ह पाहू शकता, तसेच लाईव्ह सामना जिओहॉटस्टार वरती तुम्ही पाहू शकता.
याशिवाय तुम्ही एबीपी न्यूजच्या वेबसाईटवर एबीपीलाईव्ह. कॉमवर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सर्वसामान्यांचे स्कोर माहिती जाणून घेऊ शकता.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे संपूर्ण वेळापत्रक
19 फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध न्युझीलँड, नॅशनल स्टेडियम, कराची
20 फेब्रुवारी – बांग्लादेश विरुद्ध भारत, दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, दुबई
21 फेब्रुवारी- अफगानिस्तान विरुद्ध दक्षिण अफ्रीका, नॅशनल स्टेडियम, कराची
22 फेब्रुवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
23 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, दुबई
24 फेब्रुवारी- बांग्लादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावलपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावलपिंडी
25 फेब्रुवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण अफ्रीका, रावलपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावलपिंडी
26 फेब्रुवारी- अफगानिस्तान विरुद्ध इंग्लंड, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
27 फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश, रावलपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावलपिंडी
28 फेब्रुवारी- अफगानिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
1 मार्च- दक्षिण अफ्रीका विरुद्ध इंग्लंड, नॅशनल स्टेडियम, कराची
2 मार्च- न्युझीलँड विरुद्ध भारत, दुबई अंतर्राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
सेमीफायनल आणि फायनल सामने
4 मार्च – सेमीफायनल1 दुबई इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम, दुबई
5 मार्च – सेमीफायनल 2 गद्दाफी स्टेडियम, लाहोर
9 मार्च – फायनल – गद्दाफी स्टेडियम, लाहोर (भारतीय संघ जर अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला तर दुबई मध्ये सामना खेळेल.)
हेही वाचा
“रोहित शर्माच्या विनोदबुद्धीचा मास्टरस्ट्रोक, जडेजाच्या प्रश्नावर दिले हटके उत्तर!”
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार अटीतटीचा, पण कोण बाजी मारणार?
IND vs BAN: बांगलादेशविरुद्ध या खेळाडूने मारलेत सर्वाधिक षटकार, दुसरा जवळपासही नाही






