---Advertisement---

चेल्सी फुटबॉल क्लब निघाला विक्रीला! रशियन संघमालकाचा सत्कार्यासाठी निर्णय

On: गुरूवार, मार्च 3, 2022 5:07 PM
---Advertisement---

सध्या युरोपीय देश रशिया व यूक्रन यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे. हे युद्ध सुरु असल्याने जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असल्याचे बोलले जात आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे जगभरातून रशियावर टीका होत आहे. क्रीडा जगतातूनही त्यांच्यावर कारवाई केली गेली. जागतिक ऑलिम्पिक संघटनेने रशियाला आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यास मज्जाव केला आहे. तर, फिफाने रशियाला यावर्षी होणार्या फुटबॉल विश्वचषकातून बाहेर केले आहे. अशातच आता इंग्लंडमधील प्रसिद्ध फुटबॉल क्लब चेल्सीच्या संघमालकांनी संघ विकण्याचा निर्णय घेतला आहे.

विकला जाणार चेल्सी

प्रीमियर लीगमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या चेल्सीचे रशियन संघमालक रोमन अब्राहमोविच यांनी संघ विकण्याचा निर्णय घेतला. संघाच्या अधिकृत सोशल मिडीया हँडलवरून त्यांनी ही घोषणा केली. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले,

“मी पूर्ण विचारांती चेल्सी संघ विकण्याचा निर्णय घेतला आहे. या पैशातून युक्रेनमध्ये जखमी झालेल्या लोकांवर उपचार करण्यात येतील. तसेच तेथील लोकांना शक्य ती सर्व मदत केली जाणार आहे. यासाठी आम्ही लवकरच एका सेवादायी संस्थेची स्थापना करणार आहोत.”

रोमन हे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांचे निकटवर्तीय मानले जातात. इंग्लंडने रशियावर निर्बंध लावले आहेत. त्यामुळे आगामी काळात इंग्लंडमधील सर्व मालमत्ता जप्त केली जाऊ शकते. चेल्सी क्लबने मागील १९ वर्षांमध्ये १९ प्रमुख विजेतेपदे पटकावली आहेत. ते प्रीमियर लीगचे विद्यमान विजेतेदेखील आहेत. क्लबची सध्याची एकूण किंमत ३० हजार कोटी रुपये इतकी सांगण्यात येत आहे.

हे उद्योगपती क्लब घेण्यासाठी इच्छुक

रोमन यांच्यानंतर क्लब घेण्यासाठी स्विस अब्जाधीश हॅन्सजोर्ग वायस उत्सुक आहेत. तसेच पाकिस्तानमधील प्रसिद्ध उद्योगपती जावेद आफ्रिदी यांनीदेखील क्लब विकत घेण्यास रस दाखवला आहे. आफ्रिदी हे पाकिस्तान सुपर लीगमधील पेशावर झल्मी संघाचे संघ मालक आहेत. फुटबॉल क्षेत्रात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ असल्याचे आफ्रिदी यांनी म्हटले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---