ट्रान्सफर विंडोचा उद्या (९ ऑगस्ट) हा शेवटचा दिवस आहे. याबाबतीत आजच चेल्सीने अॅथेलेटिक बिलबायोचा गोलकिपर केप अरिझबालागासाठी ८० मिलियन युरो मोजून एक जागतिक विक्रम तोडला आहे. यामुळे केप हा जगातील सगळ्यात महागडा गोलकिपर ठरला आहे.
याआधी हा विक्रम ब्राझिलियन गोलकिपर अॅलिसोन बेकर याच्या नावे होता. बेकरसाठी लीव्हरपूलने ६२.५ मिलियन युरो मोजले होते.
चेल्सीचा गोलकिपर थिबाऊट कोरटोसिसने रियल माद्रिदमध्ये जायचे ठरवल्याने त्याच्या जागी अरिझबालागाला घेण्याचे ठरवले होते. थिबाऊट चेल्सीच्या सराव सत्रास सलग दोन दिवस अनउपस्थित होता.
तसेच २३ वर्षीय, केपची वैद्यकीय चाचणी बुधवारी होणार असून ज्यामुळे तो प्रिमीयर लीगमधील संघाच्या पहिल्या सामन्यात खेळण्यास फिट असेल. शनिवारी होणारा हा सामना हडर्सफिल्ड विरुद्ध असणार आहे.
“मी केपला मागच्या वर्षी नॅप्लेसमध्ये बघितले होते. त्याच वेळी मी ओळखले की तो एक उत्कृष्ठ गोलकिपर आहे”, असे चेल्सीचे मॅनेजर मौरीझियो सॅरी म्हणाले.
केपने बिलबायोसोबत २०२५ पर्यंत करार केला होता. यामुळे या क्लबला चेल्सीने आधी ७१ मिलियन युरो देऊन या खेळाडूसंबंधीचा करार पक्का केला होता. आज बाकीची पुर्ण रक्कम देऊन केपला संघात घेतले.
बिलबायोमधील केप हा या वर्षातील दुसरा फुटबॉलपटू ठरला ज्याने एवढ्या मोठ्या रक्कमेचा करार केला. एमेरीक लॅपोर्टो याने मॅंचेस्टर सिटीबरोबर ५७ मिलियन डॉलरचा करार केला आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–पाकिस्तानी क्रिकेटपटू होणार मालामाल, नवीन करारानुसार किती रुपये मिळणार पहाच
–मुंबई क्रिकेट असोसिएशनने उचलले महत्त्वाचे पाऊल