प्रीमियर लीगमध्ये स्टॅनफोर्ड ब्रीजवर झालेल्या सामन्यात मार्कोस अलोन्सोने उशिरा केलेल्या गोलवर चेल्सीने अर्सेनलचा ३-२ असा पराभव केला. तसेच या लीगचे दोन्ही सामने जिंकत चेल्सी प्रीमियर लीगच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहचला आहे.
या सामन्याच्या पहिल्या सत्रात एकूण चार गोल झाले. पेड्रोने ९व्या आणि अल्वारो मोराटाने २०व्या मिनिटाला गोल करत चेल्सीला २-० अशी आघाडी मिळवून दिली.
पण अर्सेनलला सामना बरोबरीत करण्याची संधी मिळाली. त्यांच्याकडून खितारयनने ३७व्या आणि वोबीने ४१व्या मिनिटाला गोल केले.
सामनावीरासाठी बचावाचे नियम पाळणे जरूरी असते. हॉर्हीनियोने हेच कौशल्य दाखवले म्हणून त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. त्याने या सामन्यात ९९वेळा बॉल पास केला.
तसेच चेल्सी अर्सेनल विरूद्ध घरातील सात सामने जिंकला आहे. फक्त मागील हंगामातील एक सामना ०-० असा अनिर्णित राहिला. दोन सामन्यात पराभूत होणारे अर्सेनलचे मॅनेजर युनाई एम्रेहे दुसरे आहेत. याआधी १९८६ला स्टीव्ह बर्टेनशॉ हे पहिले तीन सामने हरले आहेत.
चेल्सी विंगर पेड्रोने या लीगमध्ये पहिल्यांदा सलग दोन सामन्यात गोल केले आहेत. अशी कामगिरी त्याने २०१७मध्ये केली होती. सामना २-२ असा बरोबरीत असताना अलोन्सोने ८१व्या मिनिटाला गोल करत संघाला विजय मिळवून दिला.
तसेच या लीगचा अर्सेनलचा पुढील सामना वेस्ट हॅम तर चेल्सीचा न्युकॅसल विरुद्ध आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–प्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय
–इंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा