भारतातील ग्रँडस्लॅम स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी चेन्नई ओपन यापुढे होणार नाही. याबद्दल तामिळनाडू टेनिस असोशिएशनने अधिकृतपणे प्रसिद्धीपत्रकात याची माहिती दिली आहे.
चेन्नई ओपन ही भारतातील प्रतिष्ठित टेनिस स्पर्धा आयएमजीने विकत घेतली असून ती आयएमजी रिलायन्स आयोजित करत होते. २०१७ हे स्पर्धेचे २१ वर्ष होते.
“तामिळनाडू टेनिस असोशिएशनला आयएमजीआरकडून मेल आला असून त्यात या एटीपी २५० प्रकारातील २०१८-१९ चे सर्व करार रद्द करण्यात आले आहेत. तामिळनाडू टेनिस असोशिएशन याबद्दल कायदेशीर गोष्टीची माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करेल. ” असे तामिळनाडू टेनिस असोशिएशनने प्रसिद्दीला दिलेल्या प्रत्रकात म्हटले आहे.
ही स्पर्धा यापुढे ‘महाराष्ट्र ओपन’ नावाने पुणे शहरात होणार असून जानेवारी २०१८ मध्ये तीच पहिल्यांदा आयोजन होईल.
“आम्ही एटीपी २५० स्पर्धेचं महाराष्ट्र राज्यात स्वागत करत आहोत. आम्हाला या स्पर्धेचं आयोजन करण्याचा मान मिळाल्यामुळे आम्ही आनंदी असून आम्ही तिला एका वेगळ्याच उंचीवर नेऊ. ” असे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दक्षिण आशियामध्ये होणारी चेन्नई ओपन ही एकमेव एटीपी वर्ल्ड टूर २५० अतिशय प्रतिष्ठेची टेनिस स्पर्धा असून यापुढे ती पुण्यात होणार आहे. महाराष्ट्र लॉन टेनिस असोशिएशन दरवर्षी $५०, ००० बक्षिसाची एटीपी चॅलेंजर स्पर्धा बालेवाडी येथे भरवते. त्यात भर म्हणजे यापुढे ‘महाराष्ट्र ओपन’ ही दक्षिण आशियामध्ये होणारी एकमेव एटीपी वर्ल्ड टूर २५० स्पर्धा सुद्धा ह्या शहरात होणार असल्यामुळे ह्या दोन स्पर्धा आयोजित करण्याचा मोठा मान पुण्याला मिळाला आहे.
१९९६ साली ‘मॅकडॉवेल ओपन’ या नावाने सुरु झालेली ही स्पर्धा पुढच्याच वर्षी अर्थात १९९७ साली चेन्नई शहरात भरवण्यात आली. चेन्नई शहरात मुख्य प्रायोजक म्हणून या स्पर्धेला आयटीसी लाभल्यामुळे या स्पर्धेचं नाव ‘गोल्ड फ्लेक ओपन’ असे करण्यात आले. एटीपीने २००१ पासून तंबाखूजन्य गोष्टींना प्रायोजक होण्यास मनाई केल्यामुळे ‘टाटा’ या स्पर्धेसाठी मुख्य प्रायोजक म्हणून लाभले. परंतु तेही खूप कमी काळ. २००५ पासून या स्पर्धेला तामिळनाडू राज्य सरकारने पाठिंबा दिला. २००५ ते २०१२ या काळात सरकारने १ कोटी तर त्यानंतर २ कोटी रुपये देऊन स्पर्धा सुरु ठेवली. त्यात त्यावेळच्या मुख्यमंत्री असणाऱ्या जयललिता यांनी पुढाकार घेतला होता. २०१२ पासून ‘एअरसेल’ या कंपनीने स्पर्धेला टायटल स्पॉन्सर म्हणून प्रायोजकत्व दिल होत.
तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर मोठ्या प्रमाणात तामिळनाडूमध्ये आलेलं राजकीय अस्थैर्य कारणीभूत ठरून त्याचा मोठा परिणाम या स्पर्धेच्या आयोजनावर झाला. महाराष्ट्र राज्याबरोबर गुजरात आणि कर्नाटक राज्य टेनिस असोशिएशन सुद्धा या स्पर्धेच आयोजन करण्यात उत्सुक होते. परंतु यात महाराष्ट्राने बाजी मारली.
A new beggining; India's premier ATP 250 event will be moving from Chennai to Pune.
Read: https://t.co/vlR8zIeqs2— Tata Open Maharashtra (@MaharashtraOpen) July 20, 2017