इंडियन प्रीमीयर लीगचा यावर्षी १५ वा हंगाम खेळवला जाणार आहे. या हंगामापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी लिलाव झाला. बंगळुरू येथे झालेल्या या लिलावात अनेक स्टार खेळाडूंना कोट्यावधी रुपयांची बोली लागलेली पाहाला मिळाली. या लिलावात गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स या दोन नव्या संघांनीही जुन्या ८ संघांसह सहभाग घेतला होता. त्यामुळे एकूण १० संघात खेळाडूंना खरेदी करण्यासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळाली. दरम्यान न्यूझीलंड संघाचा विस्फोटक फलंदाज डेवन कॉन्वेवर देखील मोठी बोली लागली आहे.
न्यूझीलंड संघाचा विस्फोटक फलंदाज डेवन कॉन्वे पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसून येणार आहे. त्याला चेन्नई सुपर किंग्ज संघाने १ कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले आहे. त्याची मूळ किंमत ७ कोटी रुपये होती.
अशी राहिली आहे कामगिरी
डेवन कॉन्वेच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत एकूण २० टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ५०.२ च्या सरासरीने ६०२ धावा केल्या आहेत. तसेच १११ सामन्यात त्याने ४४.७ सरासरीने ३६६८ धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :
विंडीजच्या ‘या’ गोलंदाजासाठी चेन्नई- मुंबईही भिडले, पण हैदराबादने ७.७५ कोटी मोजत मारली बाजी
आयपीएलच्या बाजारात ‘विश्वविजेत्या’ कर्णधारांना नाही मिळाली किंमत
पंजाबचे धन्यवाद, पण मला चेन्नईकडून अपेक्षा होत्या; शाहरुख खानने केल्या भावना व्यक्त