2025च्या इंडियन प्रीमियर लीगची (Indian Premier League) चाहत्यांना नक्कीच आतुरता लागली असेल. पण तत्पूर्वी मेगा लिलाव होणार आहे. त्यासाठी सर्व संघांनी बीसीसीआयने (BCCI) दिलेल्या नव्या नियमांनुसार आपली रिटेन्शन यादी जाहीर केली आहे. यंदाच्या मेगा लिलावात अनेक मोठ्या खेळाडूंचे संघ बदलताना दिसणार आहेत. लिलावात चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) रिषभ पंतला (Rishabh Pant) टार्गेट करू शकते, अशा चर्चांना उधाण आले आहे. परंतु त्यावर आता सीएसकेचे (CSK) सीईओ काशी विश्वनाथन यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
माजी भारतीय क्रिकेटपटू अंबाती रायडूशी (Ambati Rayudu) पॉडकास्टवर चर्चा करताना, काशी विश्वनाथन म्हणाले की, सीएसके पुन्हा जुन्या खेळाडूंना खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे. ते म्हणाले, “रिटेन्शन यादी तयार करण्याआधी आम्ही कर्णधार रूतुराज गायकवाड, महेंद्रसिंह धोनी आणि प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांच्याशी बोललो होतो. आमचा हेतू स्पष्ट आहे की ज्या खेळाडूंनी गेल्या अनेक वर्षांमध्ये संघासाठी उत्कृष्ट योगदान दिले आहे त्यांनाच सीएसकेसाठी कायम केले जावे.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “आम्हाला रूतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी, शिवम दुबे आणि मथिशा पाथिराना यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेणे सोपे होते. पण आम्हाला माहित होते की जर आम्ही या खेळाडूंना कायम ठेवायला गेलो तर आमची पर्स रिकामी होईल. आम्हाला माहित आहे की जेव्हा लिलावात इतर मोठ्या भारतीय खेळाडूंना खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा आम्ही जास्त बोली लावू शकणार नाही, आम्ही प्रयत्न करू, परंतु मला वाटत नाही की आम्ही त्यांना खरेदी करू शकेल.”
आगामी आयपीएल हंगामात सीएसकेने रिटेन केलेले 5 खेळाडू-
1) रूतुराज गायकवाड- 18 कोटी
2) मथिशा पाथिराना- 13 कोटी
3) शिवम दुबे- 12 कोटी
4) रवींद्र जडेजा- 18 कोटी
5) महेंद्रसिंह धोनी- अनकॅप्ड खेळाडू, 4 कोटी
महत्त्वाच्या बातम्या-
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताऐवजी हा देश खेळू शकतो? आयसीसी लवकरच घेणार मोठा निर्णय!
रोहितची सुट्टी, विराट होणार कर्णधार? बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीपूर्वी व्हायरल पोस्टरमुळे उडाली खळबळ
4 क्रिकेटपटू जे यावर्षी पिता बनले, लिस्टमध्ये दोन भारतीयांचाही समावेश