इंडियन प्रीमियर लीग २०२१ ची लढत सुरू होण्यासाठी अवघ्या ८ दिवसांचा कालावधी उरला आहे. ९ एप्रिल ते ३० मे या कालावधीत भारतातील वेगवेगळ्या शहरात आयपीएलचा थरार रंगणार आहे. त्यामुळे नव्या जोशाने सर्व फ्रँचायझींचे खेळाडू मैदानात घाम गाळत आहेत. त्यातही चेन्नई सुपर किंग्जने सर्वांच्या आधी सरावाला सुरुवात करत आयपीएलचे रणशिंग फुंकले आहे. नुकतेच सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी आणि ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैना यांच्या व्हिडिओने आयपीएलप्रेमींचे लक्ष वेधले आहे.
सीएसकेने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये धोनी-रैनाची जोडी नेटमध्ये कसून सराव करताना दिसत आहे.
व्हिडिओत सुरुवातीला धोनी त्याच्या बॅटला स्वत: धार देताना दिसत आहे. त्यानंतर आपल्यासह संघातील इतर खेळाडूंसाठी बॅट घेऊन जात आहे. याबरोबरच रैना आणि धोनी दोघे सोबतच नेटमध्ये फलंदाजीचा सराव करत आहेत. एवढेच नव्हे तर, नेट्समध्ये नसतानाही त्यांच्यात आयपीएल संदर्भात चर्चा चालू असल्याचे निदर्शनास येत आहे.
जवळपास एका वर्षाच्या कालावधीनंतर या जोडीला एकत्र पाहून चाहते भलेच खुश झाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.
गतवर्षी रैनाने घेतली होती माघार
भारतात कोरोना व्हायरसची परिस्थिती पाहता गतवर्षी आयपीएलचे आयोजन युएईमध्ये करण्यात आले होते. रैनाने वैयक्तिक कारणामुळे आयपीएल २०२० च्या हंगामातून माघार घेतली होती. त्याच्या अनुपस्थित सीएसकेचे प्रदर्शन जास्त खास राहिले नव्हते. सीएसके संघ प्लेऑफच्या शर्यतीतून पहिल्यांदाच बाहेर पडला होता.
एकाच दिवशी घेतली होती निवृत्ती
आयपीएल २०२०ची सुरुवात होण्यापुर्वी धोनी आणि रैनाने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत सर्वांना अचंबित केले होते. १५ ऑगस्ट रोजी ट्विटरद्वारे सुरुवातीला धोनीने त्याच्या निवृत्ती घोषणा केली होती. त्याच्यापाठोपाठ रैनानेही आपण निवृत्त होत असल्याचे जाहीर केले होते.
07:03 Anbu Moments! #Yellove #WhistlePodu 💛🦁 @msdhoni @ImRaina pic.twitter.com/eJ1pdDuLMt
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 1, 2021
नव्या अपेक्षांसह सीएसके उतरणार मैदानात
आयपीएल २०२० मधील खराब कामगिरीवर पडदा टाकत दमदार पुनरागमन करण्याचा हेतू मनात बाळगून सीएसकेचे खेळाडू मैदानात उतरणार आहेत. १० एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई येथे त्यांचा पहिला सामना रंगणार आहे. २०१०, २०११ आणि २०१८ नंतर आता चौथे जेतेपद पटकावण्यासाठी सीएसके आपले सर्वोत्कृष्ट देताना दिसेल.
महत्त्वाच्या बातम्या-
“मी टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना पाहाणार नाही”, दिग्गज गोलंदाजाचे मोठे भाष्य
दोन वेळा लग्न केलेले १२ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू, ५ नावे आहेत भारतीय