---Advertisement---

आयपीएल २०२१ साठी ‘मिस्टर आयपीएल’ने कसली कंबर, पाहा त्याची जोरदार फटकेबाजी

On: गुरूवार, मार्च 18, 2021 8:34 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा हंगाम सुरू होण्यास एक महिन्यापेक्षाही कमी कालावधी उरला आहे. त्यामुळे आयपीएलप्रेमींसह सर्व फ्रँचायझी आणि सहभागी खेळाडूंचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. यंदा आपले सर्वोत्कृष्ट देत आयपीएल चषकावर नाव कोरण्यासाठी फ्रँचायझींनी सरावाला सुरुवात केली आहे.

त्यातही गतवर्षी सर्वात पहिल्यांदा प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जचे (सीएसके) खेळाडू नेटमध्ये कसून घाम गाळताना दिसत आहेत. नुकतीच ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैना यानेही सरावाला सुरुवात केली आहे. त्याच्या सराव करतानाच्या व्हिडिओने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

रैनाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये तो स्थानिक गोलंदाजांच्या गोलंदाजीवर जोरदार फटकेबाजी करताना दिसत आहे. त्याने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आगामी हंगामात खेळण्याची पूर्ण तयारी आहे.’

https://www.instagram.com/p/CMg3Guth4Kp/?utm_source=ig_web_button_share_sheet

दिनांक १० एप्रिल रोजी मुंबई येथे दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सीएसकेचा यावर्षीचा पहिला सामना रंगणार आहे. आयपीएल २०२० मधून वैयक्तिक कारणामुळे माघार घेणारा रैना यंदा सीएसकेला चौथे जेतेपद मिळवून देण्यासाठी प्रयत्न करताना दिसेल. ३४ वर्षीय डावखुरा फलंदाज रैना हा २००८ पासून आयपीएलचा भाग आहे. त्याने सीएसकेव्यतिरिक्त गुजरात लायन्स संघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे.

रैनाने सीएसकेकडून १६४ सामने खेळले असून ४५२७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी नाबाद १०० धावा इतकी राहिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कारकिर्दीत खेळलेल्या प्रत्येक सामन्यात एकतरी झेल घेणारा भारतीय दिग्गज

INDvENG: भारतासाठी ‘करो या मरो’ स्थिती, तर इंग्लंडला विजयी आघाडीची संधी; चौथ्या टी२० बद्दल जाणून घ्या सर्वकाही

बुमराहची पत्नी संजनाच्या मेहंदीमध्ये २०१९ विश्वचषकाचा लोगो, चाहत्यांमध्ये रंगतेय ‘ही’ चर्चा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---