---Advertisement---

INDvENG: भारतासाठी ‘करो या मरो’ स्थिती, तर इंग्लंडला विजयी आघाडीची संधी; चौथ्या टी२० बद्दल जाणून घ्या सर्वकाही

On: गुरूवार, मार्च 18, 2021 1:53 AM
---Advertisement---

अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात ५ टी२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील चौथा टी२० सामना गुरुवारी(१८ मार्च) रंगणार आहे. हा सामना भारतीय संघासाठी ‘करो या मरो’ अशा स्थितीतील सामना आहे. तर इंग्लंडला मालिकेत विजयी आघाडी घेण्याची या सामन्यात संधी आहे.

मालिकेतील स्थिती

भारत आणि इंग्लंड संघातील टी२० मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने ८ विकेट्सने जिंकला. तर दुसरा सामना भारताने जिंकत १-१ अशी बरोबरी केली. मात्र, पुन्हा इंग्लंडने तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे ५ सामन्यांच्या या मालिकेत जर चौथा सामना भारताने जिंकला तर मालिकेत २-२ अशी बरोबरी होईल आणि ५ वा सामना निर्णायक ठरेल. पण जर चौथा सामना इंग्लंडने जिंकला तर मात्र ही मालिका इंग्लंडच्या खिशात जाईल आणि भारताचे आव्हान संपेल.

भारत आणि इंग्लंड संघाचा टी२० सामन्यांचा इतिहास

भारत आणि इंग्लंड संघ आत्तापर्यंत टी२० क्रिकेटमध्ये १७ वेळा आमने-सामने आले आहेत. यातील ८ सामने भारताने जिंकले आहेत, तर ९ सामने इंग्लंडने जिंकले आहेत. यातील ९ सामने भारतात झाले आहेत. या ९ सामन्यांपैकी ४ सामने भारताने जिंकले आहेत, तर ५ सामने इंग्लंडने जिंकले आहेत. तसेच सध्या टी२० क्रमवारीत इंग्लंड आणि भारत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे ही आकडेवारी पाहाता दोन्ही संघ तुल्यबळ असल्याचे लक्षात येते.

भारताच्या ११ जणांच्या संघात होऊ शकतो बदल

तिसऱ्या सामन्यात दारुण पराभव झाल्यानंतर भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघ संघात बदल होऊ शकतो. चौथ्या टी२० सामन्यासाठी केएल राहुल, युजवेंद्र चहल, शार्दुल ठाकूर यांना बाहेर बसावे लागू शकते. तसेच त्याजागी दीपक चाहर, राहुल चाहर आणि सुर्यकुमार यादवला अंतिम ११ जणांमध्ये संधी मिळू शकते.

तसेच इंग्लंडने तिसऱ्या सामन्यात विजय मिळवला असल्याने आपला विजयी संघच चौथ्या सामन्यातही कायम ठेवू शकतात. त्यामुळे इंग्लंड अंतिम ११ जणांच्या संघात बदल करण्याची शक्यता कमी आहे.

कधी, कुठे आणि केव्हा होणार भारत विरुद्ध इंग्लंड चौथा टी२० सामना घ्या जाणून –

१. भारत विरुद्ध इंग्लंड संघातील चौथा टी२० सामना केव्हा होणार?
– भारत विरुद्ध इंग्लंड संघातील चौथा टी२० सामना १८ मार्च रोजी खेळला जाणार आहे.

२. भारत विरुद्ध इंग्लंड संघातील चौथा टी२० सामना कुठे खेळवला जाणार ?
– भारत विरुद्ध इंग्लंड संघातील चौथा टी२० सामना नरेंद्र मोदी स्टेडियम, मोटेरा, अहमदाबाद येथे खेळवला जाईल.

३. भारत विरुद्ध इंग्लंड संघातील चौथा टी२० सामना किती वाजता सुरु होणार ?
– भारत विरुद्ध इंग्लंड संघातील चौथा टी२० सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.०० वाजता सुरु होईल. त्याआधी संध्याकाळी ६.३० वाजता नाणेफेक होईल.

४. भारत विरुद्ध इंग्लंड संघातील चौथ्या टी२० सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल ?
– भारत विरुद्ध इंग्लंड संघातील चौथ्या टी२० सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.

५. भारत विरुद्ध इंग्लंड संघातील चौथ्या टी२० सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल ?
– भारत विरुद्ध इंग्लंड संघातील चौथ्या टी२० सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन हॉटस्टारवर पाहाता येईल.

यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ – 

भारतीय संघ – रोहित शर्मा, केएल राहुल (यष्टीरक्षक), विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, अक्षर पटेल, शिखर धवन, दीपक चाहर, श्रेयस अय्यर, राहुल तेवतिया, टी नटराजन, इशान किशन, राहुल चाहर

इंग्लंड संघ – जेसन रॉय, जोस बटलर (यष्टीरक्षक), डेव्हिड मालन, जॉनी बेअरस्टो, ओएन मॉर्गन (कर्णधार), बेन स्टोक्स, मोईन अली, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल राशिद, सॅम बिलिंग्ज, रीस टोपली, मार्क वूड, टॉम करन, लियाम लिव्हिंगस्टोन.

महत्त्वाच्या बातम्या –

बुमराहची पत्नी संजनाच्या मेहंदीमध्ये २०१९ विश्वचषकाचा लोगो, चाहत्यांमध्ये रंगतेय ‘ही’ चर्चा

भारतीय गोलंदाजावर कोसळला दु:खाचा डोंगर, कोरोनामुळे वडीलांचे निधन

‘सुरुवात कोरोला तर शेवट फेरारीसारखा’, विराटसाठी कार्तिकने केलेल्या अनोख्या ट्विटवर चाहत्यांच्या ‘अशा’ आल्या प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---