---Advertisement---

भारतीय गोलंदाजावर कोसळला दु:खाचा डोंगर, कोरोनामुळे वडीलांचे निधन

On: गुरूवार, मार्च 18, 2021 12:16 AM
---Advertisement---

सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतासह अनेक देशांना कोरोना व्हायरसचा विळखा पडला आहे. अनेकांना या आजारामुळे जीव गमवावा लागला आहे. आता भारताचा फिरकीपटू राहुल शर्माच्या वडीलांचेही कोरोना व्हायरसमुळे निधन झाल्याचे समजत आहे. याबद्दल स्वत: राहुलने ट्विट करत माहिती दिली आहे.

चेन्नई सुपर किंग्स आणि पुणे वॉरियर्सकडून खेळलेल्या राहुलने ट्विट केले आहे की ‘शर्मा साहब खूप घाई केली. माफ करा मी तुम्हाला या कोरोनापासून वाचवू शकलो नाही. डॅड, तुमच्याशिवाय आयुष्य सारखे असणार नाही. मी तुमच्याकडून माझ्या आयुष्यातील सर्व गोष्टी शिकलो आहे. तुमची लढावू वृत्ती, इच्छाशक्ती, मेहनत, समर्पण. तुमच्यावर माझे नेहमीच प्रेम आहे. ईश्वरा माझ्या वडीलांची काळजी घे.’

https://twitter.com/ImRahulSharma3/status/1372009784724107264

राहुलने आणखी एक ट्विट करत लिहिले की ‘मी तुम्हाला वचन देतो, मी तुमचे स्वप्न पूर्ण करेल, मी भारतीय संघात पुनरागमन करेल.’

राहुलच्या या ट्विटवर वृद्धिमान साहा आणि सुर्यकुमार यादवनेही दु:ख व्यक्त केले आहे.

राहुलची कारकिर्द

राहुलने २०११ साली वेस्ट इंडिजविरुद्ध इंदोर येथे वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने भारताकडून ४ वनडे आणि २ टी२० सामने खेळले आहेत. यात त्याने वनडेमध्ये ६ आणि टी२० मध्ये ३ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय आयपीएलमध्ये त्याने ४४ सामने खेळले असून ४० विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

‘सुरुवात कोरोला तर शेवट फेरारीसारखा’, विराटसाठी कार्तिकने केलेल्या अनोख्या ट्विटवर चाहत्यांच्या ‘अशा’ आल्या प्रतिक्रिया

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरिज: इंडिया लिजेंड्सचा फायनलमध्ये प्रवेश; अटीतटीच्या सेमीफायनलमध्ये वेस्ट इंडिज पराभूत

मुंबईने ‘या’ संघावर मिळवला चार चेंडूत विजय, होळकर स्टेडियमवर घडली ऐतिहासिक घटना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---