---Advertisement---

मुंबईविरुद्धच्या सामन्यापूर्वी चेन्नईला टेंशन, डू प्लेसिसनंतर आता ‘या’ खेळाडूच्या खेळण्यावरही प्रश्नचिन्ह

On: बुधवार, सप्टेंबर 15, 2021 9:31 PM
---Advertisement---

आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये खेळले जाणार आहेत. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होईल. अशात, चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन पहिल्या सामन्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. सॅम करन सध्या दुबईत पोहचला आहे. मात्र, तो विलगीकरणात आहे.

नुकत्याच झालेल्या इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेत सॅम इंग्लंड संघाचा भाग होता. कसोटी मालिकेतील पाचवा सामना रद्द झाल्यानंतर लगेचच चेन्नईचे भारतीय खेळाडू तसेच मोईन अली यूएईत दाखल झाले. मात्र, सॅम यूएईसाठी उशीरा रवाना झाला. तो बुधवारी (१५ सप्टेंबर) यूएईत आल्यानंतर त्याला नियमांप्रमाणे सहा दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. याचा अर्थ असा होतो की, तो चेन्नई सुपर किंग्ससाठी पहिल्या सामन्यात सहभागी होऊ शकणार नाही.

चेन्नई सुपर किंग्स संघासाठी सॅमच्या रूपाने दुसरा मोठा झटका आहे. याआधी संघाचा सलामीवीर फलंदाज फाफ डू प्लेसिस याला दुखापत झाली असून मुंबई विरुद्धच्या सामन्यासाठी त्याच्या उपस्थितीवर देखील शंका निर्माण झाली आहे. या दोन खेळाडूंच्या उपस्थितीवर शंका निर्माण झाल्यामुळे संघाची चिंता वाढली आहे.

सर्व काही नियोजनाप्रमाणे राहिली तर फाफ डू प्लेसिस, ड्वेन ब्रावो आणि इम्रान ताहीर कॅरिबियन प्रीमियर लीग (सीपीएल) मधून थेट सीएसके संघासोबत सहभागी होतील. त्यांना सहा दिवसाच्या विलगीकरणार रहावे लागणार नाही, कारण ते सीपीएलच्या बायो बबल मधून आयपीएलच्या बायो बबलमध्ये दाखल होतील. मात्र, चेन्नईला सध्या डू प्लेसिसच्या दुखापतीची चिंता सतावत आहे.

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर सॅमने बायो बबल सोडला असून यूएईत आल्यानंतर त्याला सहा दिवसांचा विलागिकरणाचा कालावधी पूर्ण करावे लागणार आहे. सीपीएलदरम्यान डू प्लेसिसच्या कंबरेला दुखापत झाली होती आणि त्याने सध्या विश्रांती घेतली आहे. तो सीपीएलमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये दिसला आहे. तो सीपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

सनरायझर्स व्यवस्थापन चिंतेत, ‘या’ प्रमुख विदेशी खेळाडूला मिळेना व्हिसा

गेलचा बळी मिळवताच गोलंदाज बनला जिमनॅस्ट, भन्नाट सेलिब्रिशनचा व्हिडिओ व्हायरल

न भूतो! श्रीलंकेला क्लीन स्वीप करत दक्षिण आफ्रिकेनी केली ऐतिहासिक कामगिरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---