---Advertisement---

गेलचा बळी मिळवताच गोलंदाज बनला जिमनॅस्ट, भन्नाट सेलिब्रिशनचा व्हिडिओ व्हायरल

On: बुधवार, सप्टेंबर 15, 2021 8:59 PM
---Advertisement---

ख्रिस गेल आणि एविन लुईसच्या झंझावाती खेळीमुळे सेंट किट्स अँड नेविस पॅट्रियट्सने कॅरेबियन प्रीमियर लीगच्या (सीपीएल २०२१) अंतिम फेरीत प्रवेश केला. पॅट्रियट्सने उपांत्य फेरीत गयाना ऍमेझॉन वॉरियर्सचा ७ गडी राखून पराभव केला. त्याचवेळी, सामन्यादरम्यान एक अनोखे दृश्य पाहायला मिळाले. ऍमेझॉन वॉरियर्सच्या केविन सिंक्लेअरने स्फोटक फलंदाज ख्रिस गेलचा बळी घेतल्यानंतर अनोख्या पद्धतीने जल्लोष साजरा केला.

सिंक्लेअरचा जिम्नॅस्ट अंदाज
वेस्ट इंडीजचे अनेक खेळाडू आपल्या विविध प्रकारच्या सेलिब्रेशनसाठी सर्वांना परिचित आहेत. सीपीएलच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात गेलला बाद केल्यानंतर, केविन सिंक्लेअरने जिम्नॅस्टसारखे समरसॉल्ट लावले. त्याचा हा जल्लोष पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. गेलचा बळी घेतल्यानंतर सिंक्लेअरने दोन समरसॉल्ट मारले. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सिंक्लेअरने यापूर्वी देखील अशाप्रकारेचे सेलिब्रेशन केले होते.

सेंट किट्स आणि नेविसचा दिमाखदार विजय
प्रथम फलंदाजी करताना गयाना अमेझॉन वॉरियर्सने १७८ धावा केल्या. १७९ धावांचे लक्ष्य सेंट किट्स आणि नेविस पॅट्रियट्सने १७.५ षटकांत पूर्ण केले.

गेलने २७ चेंडूत ४२ धावांची तुफानी खेळी केली. ख्रिस गेल आणि एविन लुईस यांनी पहिल्या गड्यासाठी ७६ धावांची भागीदारी केली. एविन लुईसने ३९ चेंडूत नाबाद ७७ धावा केल्या. तत्पूर्वी, सीपीएल २०२१ च्या मंगळवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य फेरीत सेंट लुसिया किंग्सने त्रिनबागो नाईट रायडर्सचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामना बुधवारी सेंट किट्स आणि नेविस पॅट्रियट्स आणि सेंट लुसिया किंग्स यांच्यात होणार आहे. हा सामना सेंट किट्स येथील वॉर्नर पार्क मैदानावर खेळला जाईल.

महत्त्वाच्या बातम्या-

‘तुझे वय किती?’ प्रश्नाच्या उत्तरावर जेव्हा प्रशिक्षक द्रविडने घेतली दीपक चाहरची फिरकी, वाचा किस्सा 

आयपीएलमध्ये विराटच्या नेतृत्वाखाली खेळलेले ३ दिग्गज आंतरराष्ट्रीय कर्णधार

केकेआर विरुद्ध आरसीबी खेळणार निळ्या जर्सीत, कारण ऐकून कराल कौतुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---