नुकताच इंडियन प्रीमियर लीगच्या चौदाव्या हंगामाचा बहुप्रतिक्षित लिलाव पार पडला आहे. चेन्नईच्या ग्रँड चोला या पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या लिलावात सर्व फ्रँचायझींनी आपल्या संघातील रिक्त स्थाने भरून काढली. यात एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपर किंग्सचाही समावेश होता.
अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेल्या या फ्रँचायझीला हरभजन सिंग आणि केदार जाधव या मुक्त केलेल्या खेळाडूंच्या जागी योग्य पर्यायांची गरज होती. त्यानुसार त्यांनी इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अली याला ७ कोटी रुपयांना विकत घेतले. तसेच प्रतिभाशाली अनकॅप खेळाडू कृष्णप्पा गौतमसाठी सर्वाधिक ९ कोटी २५ लाख खर्च केले. या दोघांव्यतिरिक्त त्यांनी इतर ३ युवा शिलेदारांना आपल्या ताफ्यात सहभागी केले.
परंतु भारतीय संघाची ‘नवी द वॉल’ चेतेश्वर पुजारा याची निवड सर्वांसाठी ‘सरप्राइज पॅकेज’प्रमाणे ठरली. टी२० क्रिकेटचा फार अनुभव नसणाऱ्या पुजाराला चेन्नईने ५० लाखांना विकत घेतले. तत्पुर्वी त्यांनी रॉबिन उथप्पाला राजस्थान रॉयल्समधून ट्रेड करत संघात सामील केले होते. यासह धोनीचा चेन्नई संघ आधीपेक्षा जास्त मजबूत बनला आहे. त्यामुळे आजवर तीनवेळा आयपीएलचा चषक पटकवणारा चेन्नई संघ यंदा चौथ्यांदा विजेता बनण्यासाठी जिवाचे रान करताना दिसेल.
New entrants into the #SuperFam! #WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/sSLqD0jESp
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) February 18, 2021
चेन्नई सुपर किंग्स – २५ खेळाडू (८ परदेशी)
लिलावाआधी संघात कायम असलेले खेळाडू –
एमएस धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अंबाती रायुडू, केएम आसिफ, दीपक चाहर, ड्वेन ब्राव्हो, फाफ डु प्लेसिस, इमरान ताहिर, नारायण जगदीसन, कर्ण शर्मा, लुंगी एन्गिडी, मिशेल सँटनर, रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, जोश हेझलवुड, आर साई किशोर, सॅम करन, रॉबिन उथप्पा.
लिलावात खरेदी केलेले खेळाडू –
कृष्णप्पा गौतम (९.२५ कोटी), मोईन अली (७ कोटी), चेतेश्वर पुजारा (५० लाख), के भागवथ वर्मा (२० लाख), सी हरी निशांथ (२० लाख), एम हरिशंकर रेड्डी (२० लाख).
महत्त्वाच्या बातम्या-
संपूर्ण यादी : आयपीएल २०२१ लिलावानंतर ‘असे’ आहेत सर्व ८ संघांचे खेळाडू
दुर्दैवच म्हणायचं अजून काय! ५ स्टार क्रिकेटपटू, ज्यांना लिलावात कुणीही मिळाला नाही खरेदीदार
बॉलिवूडचा ‘किंग खान’च्या नावावर आपले नाव ठेवणारा शाहरुख बनला कोट्याधीश, वाचा त्याची रोमांचक कहाणी