दोन दिवसीय आयपीएल 2025चा मेगा लिलाव काल रात्री (25 नोव्हेंबर) सोमवारी संपला. पाच वेळाचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सने लिलावात 25 खेळाडूंचा मजबूत संघ तयार केला. 55 कोटी रुपये घेऊन लिलावात उतरलेल्या सीएसकेने 20 खेळाडूंना खरेदी केले. चेन्नईने अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज नूर अहमदवर सर्वाधिक पैसा खर्च केला. 19 वर्षीय नूरवर संघाने 10 कोटी रुपये केले. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. हा अफगाणी खेळाडू आयपीएल 2024 मध्ये गुजरात टायटन्सचा भाग होता. चेन्नईने 25 खेळाडूंचा संघ बनवला आहे. ज्यामध्ये सात विदेशी खेळाडू आहेत. सीएसकेच्या पर्समध्ये फक्त 5 लाख रुपये शिल्लक होते.
चेन्नईत जन्मलेला रविचंद्रन अश्विन आता पुन्हा घरच्या मैदानावर परतला आहे. सीएसकेने त्याला 9.75 कोटी रुपयांना करारबद्ध केले. या अनुभवी फिरकीपटूची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. तो 2009 ते 2015 पर्यंत सीएसकेमध्ये खेळला आहे. लिलावापूर्वी त्याला राजस्थान रॉयल्सने सोडले होते. सीएसकेने न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्रला अनुक्रमे 6.25 कोटी आणि 4 कोटी रुपयांना विकत घेतले. लिलावापूर्वी चेन्नईने दोघांनाही सोडले होते. लिलावापूर्वी फ्रँचायझीने कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि एमएस धोनीसह 5 खेळाडूंना कायम ठेवले होते.
सीएसकेने मेगा लिलावात विकत घेतले खेळाडू
नूर अहमद – 10 कोटी रुपये
रविचंद्रन अश्विन – 9.75 कोटी रुपये
डेव्हॉन कॉनवे – 6.25 कोटी रुपये
राहुल त्रिपाठी – 3.4 कोटी रुपये
रचिन रवींद्र – 4 कोटी रुपये
खलील अहमद – 4.80 कोटी रुपये
अंशुल कंबोज – 3.4 कोटी रुपये
गुर्जपनीत सिंग – 2.2 कोटी रुपये
नॅथन एलिस – 2 कोटी रुपये
दीपक हुडा – 1.7 कोटी रुपये
जेमी ओव्हरटन – 1.5 कोटी रुपये
विजय शंकर – 1.2 कोटी रुपये
मुकेश चौधरी – 30 लाख रुपये
कमलेश नगरकोटी – 30 लाख रुपये
श्रेयस गोपाल – 30 लाख रुपये
रामकृष्ण घोष- 30 लाख रुपये
आंद्रे सिध्दार्थ – 30 लाख रुपये
आयपीएल 2025 साठी सीएसकेचा पूर्ण संघ
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), मथिशा पाथीराना, डेव्हॉन कॉनवे, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी, राहुल त्रिपाठी, रचिन रवींद्र, रविचंद्रन अश्विन, खलील अहमद, नूर अहमद, विजय शंकर, सॅम कुरन, शेख रशीद, अंशुल कंबोज, मुकेश चौधरी, दीपक चौधरी. हुड्डा, कमलेश नागरकोटी, रामकृष्ण घोष, गुर्जपनीत सिंग, वंश बेदी, नॅथन एलिस, आंद्रे सिद्धार्थ, जेमी ओव्हरटन, श्रेयस गोपाल.
हेही वाचा-
RCB Full Squad; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा नवा संघ अधिकच शक्तिशाली! कर्णधारपद मात्र कोड्यात
मेगा लिलावत आरसीबीची योग्य खेळी! या खेळाडूला ताफ्यात घेताचं 15 चेंडूत ठोकले अर्धशतक
लिलावानंतर मुंबई इंडियन्सची पलटण मजबूत! संघानं धोनीच्या विश्वासूलाच घेतलं ताफ्यात