---Advertisement---

भारतीय सैनिकांबद्दलचे वादग्रस्त ट्वीट चेन्नई सुपर किंग्जच्या डॉक्टराला पडले महागात; केले सस्पेंड…

On: बुधवार, जून 17, 2020 8:57 PM
---Advertisement---

नवी दिल्ली । आयपीएल फ्रंचायझी संघ चेन्नई सुपर किंग्ज संघाचे डॉ. मधु थोट्टप्पिल्लिल यांनी विवादात्मक ट्वीट केल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

खरंतर डॉ. मधुने लडाख येथे २० भारतीय सैनिक शहीद झाल्यानंतर ट्वीट केले होते. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले होते, “मी हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे, की परत येणाऱ्या शवपेटींवर ‘पीएम केअर’चे स्टिकर लावले असेल की नाही.”

त्यांनी ट्वीट करताना भारतीय सैनिकांचे नाव घेतले नाही. परंतु इशाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) निशाना साधला आहे. तरी हा वाद शिगेला पोहोचल्यानंतर त्यांनी आपले ट्विटर अकाऊंट लॉक केले आहे.

या ट्वीटबद्दल अनेक चाहत्यांनी चेन्नई सुपर किंग्जकडे तक्रार करत म्हटले, “चेन्नई सुपर किंग्ज, हा व्यक्ती तुमच्या संघाचा फिजिओ आहे, की नाही हे तपासून घ्या. ही लाजिरवाणी बाब आहे, की वैद्यकीय व्यवसायाशी जोडलेला व्यक्ती इतका असंवेदनशील कसा असू शकतो. जो भारतीय सैनिक शहीद झाल्यानंतर त्यांची थट्टा करत आहे.”

चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) यावर प्रत्युत्तर देत म्हटले, “सीएसकेने चीनच्या सैन्याविरूद्ध लडाखमध्ये शहीद झालेल्या भारतीय सैन्यदलाच्या २० सैनिकांचा उल्लेख केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे डॉक्टर मधु थोट्टप्पिल्लिलला त्याच्या सोशल मीडिया पोस्टसाठी निलंबित केले आहे.”

सीएसकेने त्या डॉक्टराच्या ट्वीटला वाईट असल्याचेही म्हटले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---