गतविजेत्या गुजरात टायटन्स संघाला पराभवाची धूळ चारत चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल 2023 चे विजेतेपद आपल्या नावे केले. सोमवारी (29 मे) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडलेल्या अंतिम सामन्यात एम एस धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नईने 5 विकेट्सने गुजरातचा पराभव केला. चेन्नईचे हे पाचवे आयपीएल विजेतेपद ठरले. एमएस धोनी पाच आयपीएल विजेतेपदे पटकावणारा रोहित शर्मानंतर दुसरा कर्णधार बनला. मात्र, चेन्नईचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी पाच आयपीएल विजेतेपदे जिंकणारा पहिला प्रशिक्षक होण्याची दैदिप्यमान कामगिरी देखील करून दाखवली.
अखेरच्या चेंडूपर्यंत अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात चेन्नईने विजय मिळवला. सुरुवातीला 20 षटकात मिळालेले 215 धावांचे आव्हान पाऊस आल्यामुळे 15 षटकात 171 करण्यात आलेले. मात्र, सर्वच फलंदाजांनी दिलेल्या योगदानामुळे चेन्नईने अखेरच्या चेंडूवर हे आव्हान पार केले.
यासह कर्णधार म्हणून धोनीचे हे पाचवे आयपीएल विजेतेपद ठरले. यापूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने ही कामगिरी करून दाखवली आहे. मात्र, त्याच्याबरोबरच स्टीफन फ्लेमिंग हे पाच आयपीएल पटकावणारे एकमेव प्रशिक्षक बनले. आयपीएलच्या पहिल्या हंगामात फ्लेमिंग खेळाडू म्हणून चेन्नईचा भाग होते. मात्र, त्यानंतर अव्याहतपणे त्यांनी चेन्नईचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळले आहे.
चेन्नई सुपर किंग्सवर दोन वर्षाची बंदी आलेली असताना ते रायझिंग पुणे सुपरजायंट्सच संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. एकदा ते पुणे संघाला अंतिम फेरीत नेण्यात यशस्वी ठरलेले. या अंतिम सामन्यात पुणे संघाला एका धावेने निसटता पराभव पत्करावा लागलेला.
फ्लेमिंग प्रशिक्षक असताना चेन्नईने 2010, 2011, 2018, 2021 व आता 2023 अशी पाच वेळा आयपीएल ट्रॉफी उंचावली आहे. त्यानंतर माहेला जयवर्धनेने मुंबईसाठी तीन वेळा व ट्रेव्हर बायलिस यांनी केकेआरसह दोनदा विजेता होण्याचा मान मिळवलेला.
(Chennai Super Kings Head Coach Stephen Fleming Becomes Fifth Time IPL Winning Coach)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्राचे ‘6’ मावळे ज्यांनी गाजवलाय आयपीएलचा सोळावा हंगाम, चौघांनी तर ट्रॉफीच जिंकलीये
नाचू किती…! ढोल वाजू लागताच दीपक चाहरने सुरु केला भांगडा, बेभान होऊन नाचला; बायकोनेही दिली साथ