2025च्या आयपीएल संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलच्या पुढील हंगामापूर्वी एक मेगा लिलाव आयोजित केला जाणार आहे. अशा परिस्थितीत, नियमांनुसार, मेगा लिलावापूर्वी, सर्व संघांना त्यांच्या संबंधित राखून ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागणार आहे. रिपोर्ट्सनुसार, आता संघ चारऐवजी 6 खेळाडूंना कायम ठेवू शकतात. अशा परिस्थितीत चेन्नई सुपर किंग्ज कोणत्या 6 खेळाडूंना कायम ठेवू शकते हे या बातमीद्वारे जाणून घेऊया.
रिपोर्टनुसार, चेन्नई सुपर किंग्जनं (CSK) कायम ठेवण्यासाठी 6 खेळाडूंची यादी तयार केली आहे. या 6 खेळाडूंशिवाय इतर सर्व खेळाडूंना सोडण्यात येणार आहे. कायम ठेवलेल्या खेळाडूंच्या यादीत कर्णधार रुतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad), अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja), शिवम दुबे, वेगवान गोलंदाज मथिशा पाथिराना, सलामीवीर फलंदाज डेव्हाॅन कॉनवे आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) यांचा समावेश आहे.
याचा अर्थ चेन्नई सुपर किंग्ज (CSK) शार्दुल ठाकूर, मुस्तफिजुर रहमान, रचिन रवींद्र, डॅरिल मिचेल, दीपक चहर, अजिंक्य रहाणे, मोईन अली या स्टार खेळाडूंना सोडणार आहे. याशिवाय समीर रिझवी, तुषार देशपांडे यांसारख्या युवा खेळाडूंना देखील सोडण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आशिष नेहरा सोडणार गुजरात टायटन्सची साथ? मोठं अपडेट समोर
या दशकात 5 खेळाडूंनी भारतासाठी केल्या सर्वाधिक धावा, रोहित-विराटनंतर ‘या’ खेळाडूंचे वर्चस्व
कोहली ऑस्ट्रेलियातून परतल्यानंतर कोच शास्त्री सतत भांडायचे; भारतीय खेळाडूचा धक्कादायक खुलासा