---Advertisement---

सीएसके मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! आयपीएल 2024 आधी आखली नवी रणनिती

On: मंगळवार, नोव्हेंबर 14, 2023 9:03 PM
---Advertisement---

जगातील सर्वात मोठी टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल स्पर्धेचा पुढील हंगाम एप्रिल महिन्यापासून खेळला जाईल. यासाठी खेळाडूंचा मिनी लिलाव पुढील महिन्यात पार पडेल. तत्पूर्वी खेळाडूंची ट्रेडिंग विंडो सुरू आहे. अशात आता स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्सने एक मोठा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.

चेन्नई सुपर किंग्स आयपीएल स्पर्धेतील सर्वात यशस्वी फ्रेंचायझी आहे. त्यांनी आतापर्यंत पाच वेळा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले असून तब्बल दहा वेळा अंतिम सामना खेळला आहे. स्पर्धेच्या 17 व्या हंगामात उतरण्याआधी ते आपल्या संघात काही मोठे बदल करण्याची शक्यता आहे. मागील वर्षी चेन्नईने तब्बल 16 कोटी रुपयांना आपल्या संघात सामील करून घेतलेला इंग्लंडचा कसोटी कर्णधार व दिग्गज अष्टपैलू बेन स्टोक्स याला ते करारमुक्त करू शकतात.

सीएसकेच्या एका अधिकाऱ्याने बोलताना म्हटले,

“बेन एक मोठा खेळाडू आहे यात वाद नाही. मात्र, तो किती उपलब्ध आहे याबाबत विचार करून त्याला कायम ठेवायचे की करारमुक्त करायचे हे ठरवू. तो जर संपूर्ण स्पर्धा खेळणार नसेल तर त्याला देण्यात येत असलेल्या किमतीत अनेक चांगले खेळाडू उपलब्ध होऊ शकतात.”

स्टोक्स याने मागील वर्षी चेन्नईसाठी केवळ दोन सामने खेळले होते. अंगठ्याच्या दुखापतीमुळे तो स्पर्धेत जास्त वेळ दिसला नाही. तसेच स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना झालेला. नुकत्याच झालेल्या वनडे विश्वचषकातही त्याची कामगिरी तितकी चांगली झाली नव्हती. तसेच तो दुखापतीमुळे गोलंदाजी देखील करत नाही. त्यामुळे आता इतर संघही त्याच्यावर बोली लावतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

(Chennai Super Kings Might Release Ben Stokes Ahead IPL 2024)

हेही वाचा-
IND vs NZ सेमीफायनलपूर्वी आली विलियम्सनची प्रतिक्रिया; म्हणतो, ‘ही तर फक्त एक दिवसाची…’
‘मान्य करावंच लागेल, सेमीफायनलमध्ये दबाव…’, कोच द्रविडचे न्यूझीलंडशी भिडण्यापूर्वी मोठे विधान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---