आयपीएलच्या 14 व्या सत्राला लवकरच सुरूवात होणार असल्याने एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने मुंबई गाठली आहे. या ठिकाणीच ते सरावही करणार आहेत. दरम्यान मुंबईतील सराव सत्रातील धोनीचे एक छायाचित्र जोरदार व्हायरल होत आहे, त्यामध्ये एक नेट गोलंदाज ‘माही’च्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेताना दिसत आहे.
सीएसकेच्या फॅन्स आर्मीने हे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले आहे, जे खूप व्हायरल होत आहे. चाहतेदेखील या छायाचित्रावर प्रतिक्रिया देत आहेत. हे चित्र पाहून आपल्याला समजेल की सीएसके संघातील खेळाडूंमध्ये धोनीप्रती किती आदर आहे.
आयपीएल 2021 साठी सीएसकेचे सर्वच खेळाडू जोरदार सराव करताना दिसत आहेत. सराव सत्राची अनेक छायाचित्रे सीएसकेच्या अधिकृत ट्विटरवर शेअर केली गेली आहेत, ज्यात संघातील अनुभवी आणि युवा खेळाडू सराव सत्रादरम्यान प्रचंड घाम गाळताना दिसत आहेत.
Net Bowler Touches DHONI's Feet..🙇♂🔥#WhistlePodu | @ChennaiIPL pic.twitter.com/lIAtXQD3Ks
— CSK Fans Army™ (@CSKFansArmy) March 27, 2021
Net bowler touches Dhoni's feet during today's practice session in Mumbai. ❤️🙏🏻#MSDhoni | © @ChennaiIPL | #WhistlePodu pic.twitter.com/5ZFUwT2sPT
— DHONIsm™ ❤️ (@DHONIism) March 27, 2021
#msdhoni
Net bowler touches Dhoni's feet during today's practice session in Mumbai. ❤️🙏🏻#MSDhoni pic.twitter.com/3jAQW8S8z9— Guddu Yadav (@yadav_guddu01) March 28, 2021
दरवेळी प्रमाणे पुन्हा एकदा सीएसकेचा कर्णधार धोनीची खेळी पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. ऑगस्ट 2020 मध्ये धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. परंतु आयपीएलच्या 13 व्या सत्रात तो खेळताना दिसला होता. मागील आयपीएल मोसमात धोनीची कामगिरी खूप निराशाजनक होती. इतकेच नाही तर सीएसकेचा संघ प्रथमच आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्यास अपयशी ठरला होता. अशा परिस्थितीत, यावेळी सीएसकेचा संघ नवीन रणनीती घेऊन मैदानात उतरणार आहे.
आयपीएल 2021 मध्ये सीएसके संघ आपला पहिला सामना 10 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल संघाविरुद्ध खेळणार आहे. यावेळी सुरेश रैनाही सीएसके संघात खेळताना दिसणार आहे. गेल्या सत्रात वैयक्तिक कारणांमुळे तो आयपीएलला मुकला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
कोणी धावा चोपल्या, कोणी विकेट्स घेतल्या! पाहा भारत-इंग्लंड वनडे मालिकेतील टॉप-५ फलंदाज आणि गोलंदाज
‘सिजन ऑफ लाइफटाइम’, वनडे सीरिज विजयानंतर प्रशिक्षक शास्त्रींचे मन जिंकणारे ट्विट
सातासमुद्रापार रिषभ पंतच्या ‘रिव्हर्स स्कूप’चा जलवा; व्हिडिओ पाहून म्हणाल, सेम टू सेम!