इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील सर्वात महत्त्वाचा सामना गुरुवारी (दि. २१ एप्रिल) मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात खेळला जाणार आहे. हा सामना नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडिअम येथे होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७.३० वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी ७ वाजता नाणेफेक झाली. (Chennai Super Kings opt to bowl)
या सामन्यात चेन्नई संघ २ बदलांसह मैदानावर उतरणार आहे. मोईन अली आणि ख्रिस जॉर्डन हे संघातून बाहेर झाले आहेत, तर ड्वेन प्रिटोरियस आणि मिशेल सँटनरची संघात एन्ट्री झालीये. दुसरीकडे, मुंबई संघात ३ बदल झाले आहेत. रिले मेरिडिथ मुंबईसाठी पदार्पण करत आहे. तसेच, ऋतिक शोकीन संघात ऑफ स्पिनर आहे आणि आयपीएल पदार्पणही करत आहे. याव्यतिरिक्त डॅनियल सॅम्सचे पुनरागमन झाले आहे.
https://twitter.com/IPL/status/1517136225458880513
आमने- सामने कामगिरी
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सने (Mumbai Indians vs Chennai Super Kings) आतापर्यंत ३४ वेळा एकमेकांचा सामना केला आहे. यामध्ये मुंबई संघ चेन्नईवर भारी पडला आहे. मुंबईने चेन्नईविरुद्ध १९वेळा विजय मिळवला आहे, तर चेन्नईला १३ वेळा मुंबईविरुद्ध विजय मिळवण्यात यश आले आहे. आजच्या सामन्यात कोण बाजी मारतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, डॅनियल सॅम्स, ऋतिक शोकीन, रिले मेरेडिथ, जयदेव उनाडकट, जसप्रीत बुमराह
चेन्नई सुपर किंग्स- ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा (कर्णधार), एमएस धोनी (यष्टीरक्षक), ड्वेन प्रिटोरियस, ड्वेन ब्रावो, मिशेल सँटनर, महीश थीक्षणा, मुकेश चौधरी
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘भारत- पाकिस्तानपेक्षा कमी नाही मुंबई आणि चेन्नईचा सामना’, असं का म्हणाला हरभजन सिंग?
कर्णधार मयंकने ‘या’ ३ सुधारणा केल्या तरंच बरं, नाहीतर पंजाब संघ होऊ शकतो प्लेऑफमधून बाहेर
आयपीएलमध्ये ‘या’ विक्रमांमध्ये ‘नंबर वन’ आहे डेव्हिड वॉर्नर, अन्य कोणी आसपासही नाहीत