आयपीएलच्या 13 व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सने आपल्या कामगिरीने सर्वांनाच निराश केले आहे. शुक्रवारी (23 ऑक्टोबर) मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा लाजिरवाणा पराभव झाला. यासामन्यादरम्यान पुढच्या हंगामापूर्वी होणाऱ्या लिलावाची कोणता संघ आतुरतेने वाट पाहत असेल तर, तो चेन्नई संघ आहे, असे समालोचक आकाश चोप्राने ट्विट करत म्हटले आहे. तसेच जे घडत आहे, त्यावर विश्वासच बसत नाही, असे माजी गोलंदाज इरफान पठाणने म्हटले आहे.
आयपीएलमध्ये आपल्या कामगिरीने चेन्नईने नेहमीच सर्वांना प्रभावित केले आहे. हा संघ 3 वेळा चॅम्पियनही ठरला होता. परंतु या हंगामात या संघाने आपल्या आयपीएलच्या इतिहासातील सर्वात खराब कामगिरी केली आहे. मुंबईविरुद्ध पॉवरप्लेमध्ये चेन्नईने पाच गडी गमावले होते. पॉवरप्लेनंतर कर्णधार एमएस धोनी बाद झाला आणि 43 धावांवर या संघाने 7 गडी गमावले होते. चेन्नईला अशा अवस्थेत पाहून कुणाचाही विश्वास बसला नाही.
समालोचक आकाश चोप्रा याने चेन्नईच्या खराब कामगिरीनंतर ट्विट केले होते. त्याने लिहिले की,“पुढील आयपीएलपूर्वी लिलावाची आतुरतेने वाट पाहणारा कोणता संघ असेल तर, तो चेन्नई संघ आहे. चेन्नई संघ पुढील हंगामासाठी कोणाला संघात कायम ठेवले जाईल? ते संघात कोणाला कायम ठेवतील का?”
https://twitter.com/cricketaakash/status/1319652702335520770?s=19
भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने ट्वीट करत लिहिले की, “जे घडत आहे त्यावर माझा विश्वास नाही.”
https://twitter.com/IrfanPathan/status/1319647411392790529?s=19
या सामन्यात चेन्नईला 20 षटकांत केवळ 114 धावा करता आल्या. प्रत्युत्तरादाखल मुबईने केवळ 12.2 षटकांत हे लक्ष्य गाठले.
चेन्नईने या हंगामात खेळलेल्या 11 सामन्यातील हा त्यांचा 8 वा पराभव होता.गुणतालिकेत चेन्नई तळाशी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल खेळण्यास तयार नसलेल्या मुंबईच्या गोलंदाजानेच मोडलं चेन्नईच कंबरडं, पाहा काय केली कामगिरी
मुंबईच्या गोलंदाजांपुढे चेन्नईच्या फलंदाजांची त्रेधातिरपिट; पहिल्यांदाच झाला १० विकेट्सने पराभव
नेहमी खिशात लाकडाचा तुकडा घेऊन फिरतो दिल्लीचा अष्टपैलू, काय आहे यामागचं गुपित
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलच्या १३ व्या हंगामात धोनीचा चेन्नई संघ झाला फ्लॉप, ही आहेत ३ प्रमुख कारणे
‘त्याच’ नाव जरी घेतलं तरी लोकं म्हणायचे, ‘यावर्षी किती कोटी रुपये?’
“कॅप्टन! मी उद्या वर्ल्डकप फायनल खेळणार आहे”, बोट तुटलेले असतानाही ‘तो’ मैदानात उतरला




