आयपीएल 2025 च्या रिटेन्शन्ससाठी आता काही तासांचाच अवधी शिल्लक आहे. 31 ऑक्टोबरला सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्व संघ आपली रिटेन केलेल्या खेळाडूंची लिस्ट बीसीसीआयला सुपूर्त करेल. त्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक अनोखी पोस्ट केली. या पोस्टद्वारे संघानं रिटेन केलेल्या खेळाडूंबाबत हिंट दिली आहे.
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी टीम असलेली चेन्नई सुपर किंग्ज कोणकोणत्या खेळाडूंना रिटेन करेल, याबाबत चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. यामध्ये सर्वात जास्त चर्चा होत आहे ती महेंद्र सिंह धोनी याची. आपल्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर असलेला धोनी या आयपीएलमध्ये खेळणार की नाही, हा सस्पेंस अद्याप कायम आहे. मात्र आता चेन्नईनं एक ट्विट करून धोनीसंबंधी मोठी हिंट दिली.
चेन्नई सुपर किंग्जनं आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक ट्विट केलं, ज्यात त्यांनी वेगवेगळे 5 इमोजी शेअर केले आहेत. हे इमोजी पाहून चेन्नई या 5 खेळाडूंना रिटेन करणार असल्याचं बोललं जात आहे. हे पाच खेळाडू आहेत – कर्णधार ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, मथीशा पाथिराना, महेंद्रसिंह धोनी आणि रचिन रवींद्र.
चेन्नई सुपर किंग्जनं हे ट्विट करताच चाहत्यांनी याबाबत विविध अंदाज लावायला सुरुवात केली. अनेकांनी इमोजींचा संबंध रिटेन करण्यात आलेल्या खेळाडूंशी लावला आहे. जसं की हेलिकॉप्टरचा इमोजी म्हणजे धोनी आहे तर तलवारीचा इमोजी म्हणजे रवींद्र जडेजा आहे. जडेजाचं तलवारबाजीचं सेलिब्रेशन खूप फेमस आहे. चेन्नईच्या संघानं याबाबत अद्याप काहीही अधिकृत माहिती दिली नाही. मात्र या ट्विटमुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे, हे निश्चित. तुम्ही चेन्नईचं हे ट्विट येथे पाहू शकता.
💛😍🔥🤝✅🌟
💪🧑🍳⚡🦁🕸️⚓
🚀🧨🏏🥊🛶🎯
🏓🎤🎩⏳🚁🔍
🛡️⚔️🧸🥝🎠🤞
The Ones You Seek is Seeking You!Tap the 🔗 – https://t.co/MNwIFDgxBK
and play the #DeadlineDay now! #WhistlePodu #Retentions2025— Chennai Super Kings (@ChennaiIPL) October 29, 2024
हेही वाचा –
‘कौन बनेगा करोडपती’मध्ये विचारला 6 लाख रुपयांचा क्रिकेटचा प्रश्न! तुम्हाला उत्तर माहित आहे का?
“टीम इंडियाला पराभूत करणे हेच अंतिम ध्येय…”, पॅट कमिन्सची खोचक प्रतिक्रिया
मुंबई कसोटीपूर्वी या नवख्या खेळाडूला संघात स्थान! रोहितची खेळी की कोच गंभीरचा विश्वास?