---Advertisement---

मुंबई कसोटीपूर्वी या नवख्या खेळाडूला संघात स्थान! रोहितची खेळी की कोच गंभीरचा विश्वास?

---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मुंबईत होणार आहे. या सामन्यात हर्षित राणाला खेळण्याची संधी मिळू शकते. टीम इंडिया हर्षितला पदार्पणाची संधी देऊ शकते. मालिकेत आधीच भारताचा न्यूझीलंडकडून 0-2 असा पराभव झाला असून आता शेवटचा सामना मुंबई येथे खेळवला जाणार आहे. त्यामुळे हर्षित राणाला वानखेडे स्टेडियमवर कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर अनेक दिवसांपासून त्याच्यावर लक्ष ठेवून आहे.

बॉर्डर-गावस्कर स्पर्धेसाठी टीम इंडियाने हर्षित राणाचा 18 सदस्यीय संघात समावेश केला आहे. पुढील महिन्यापासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. हर्षित राणा या मालिकेत खेळताना दिसणार आहे. त्यामुळे त्याला मुंबईत खेळण्याची संधी मिळू शकते. इंडियन एक्सप्रेसमधील एका बातमीनुसार, हर्षित राणाचे पदार्पण जवळपास निश्चित झाले आहे.

 

टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर हर्षित राणावर बारीक लक्ष ठेवून आहे. राणा आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत आहे. तर गंभीरच्या कोचिंगमध्ये केकेआर चॅम्पियन झाला. राणा आणि गंभीर यांनी केकेआरमध्ये एकत्र काम केले आहे. ज्यामध्ये त्याने समाधानकारक कमगिरी केली होती. तसेच हर्षित राणाचा देशांतर्गत सामन्यांमध्येही उत्कृष्ट विक्रम आहे. त्यामुळे आता तो टीम इंडियासाठी कसोटी पदार्पण करू शकतो.

हर्षित राणाच्या कारकिर्दीबाबत बोलायचे झाल्यास त्याने, आतापर्यंत प्रथम श्रेणीत 10 सामने खेळले आहेत. या ज्यामध्ये त्याने 43 विकेट्स घेतल्या आहेत. राणाची एका डावातील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 45 धावांत 7 बळी. त्याने 14 लिस्ट ए सामन्यात 22 विकेट घेतल्या आहेत. हर्षित राणाने 25 टी20 सामन्यात 28 विकेट घेतल्या आहेत. आता तो आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

हेही वाचा-

INDW vs NZW; मिताली राजसाठी 23 वर्षे लागली, मंधानाने केवळ 11 वर्षात केले हा चमत्कार
चाहत्यांसाठी खुशखबर..! विराट कोहली पुन्हा एकदा कर्णधाराच्या भूमिकेत!
“भारताला हरवणे शक्य…”, मुंबई कसोटीपूर्वी न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजाची प्रतिकिया

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---