---Advertisement---

आयपीएल तोंडावर असताना धोनी ‘फुल्ली लोडेड फॉर्म’मध्ये; पाहा नजर न हटणाऱ्या ‘हेलिकॉप्टर शॉट’ची आतिषबाजी

On: सोमवार, एप्रिल 5, 2021 5:08 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग ही अशी क्रिकेट स्पर्धा जिचे नाव ऐकताच अनेकांच्या नसानसात उत्साहाचे वारे संचारू लागते. ९ एप्रिल रोजी सुरू होणाऱ्या या महासंग्रामासाठी सहभागी खेळाडू स्वत:ला झोकून देऊन मैदानावर घाम गाळत आहेत. अशात गतवर्षी सपशेल फ्लॉप ठरलेला चेन्नई सुपर किंग्ज दुप्पट उत्स्फुर्तीने मैदानावर उतरण्याच्या तयारीत आहे. कर्णधार एमएस धोनी यानेही आयपीएल २०२१ साठी कंबर कसली आहे. त्याचा सराव सत्रातील जुना अंदाज पाहून चेन्नईचे चाहते भलतेच खुश झाले आहेत.

चेन्नई संघाने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर धोनीचा सराव सत्रातील व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत धोनी त्याच्या जुन्या ढंगात फलंदाजी करताना दिसत आहे. दरम्यान त्याचा प्रसिद्ध हेलिकॉप्टर शॉटही मारताना दिसताना आहे. चेन्नई संघाने या व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये तमिळ गाणे जोडत अतिशय सुरेख पद्धतीने व्हिडिओ एडिट केला आहे.

क्रिकेट रसिकांकडून या व्हिडिओला भरभरुन प्रेम मिळताना दिसत आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओने धुमाकूळ घातला आहे.

https://www.instagram.com/p/CNRazeGgzSa/?utm_source=ig_web_button_share_sheet

आयपीएलमधील यशस्वी संघांपैकी एक असणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने आत्तापर्यंत आयपीएलचे ३ वेळा विजेतेपद जिंकले आहे. एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई संघ गतवर्षी खास कामगिरी करू शकला नव्हता. त्यामुळे यावर्षी चेन्नईचा संघ दमदार पुनरागमन चौथे जेतेपद जिंकण्याच्या इराद्याने खेळेल.

अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेल्या चेन्नईच्या या हंगामातील एकूण १४ सामन्यांपैकी १२ सामने रात्री ७.३० वाजता होतील. तर उर्वरित २ सामने दुपारी ३.३० वाजता होतील. १० एप्रिल रोजी मुंबईत दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध चेन्नईची पहिली लढत होईल.

असे आहेत आयपीएल २०२१ मधील चेन्नई सुपर किंग्सचे साखळी फेरीतील सामने-

१० एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, मुंबई, संध्याकाळी ७.३० वाजता
१६ एप्रिल – पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई, संध्याकाळी ७.३० वाजता
१९ एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, मुंबई, संध्याकाळी ७.३० वाजता
२१ एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई, संध्याकाळी ७.३० वाजता
२५ एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, मुंबई, दुपारी ३.३०
२८ एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली, संध्याकाळी ७.३० वाजता
१ मे – मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली, संध्याकाळी ७.३० वाजता
५ मे – राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली, संध्याकाळी ७.३० वाजता
७ मे – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली, संध्याकाळी ७.३० वाजता
९ मे – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज, बंगळुरू, दुपारी ३.३० वाजता
१२ मे – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, बेंगलोर, संध्याकाळी ७.३० वाजता
१६ मे – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स, बंगळुरू, संध्याकाळी ७.३० वाजता
२१ मे- दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता, संध्याकाळी ७.३० वाजता
२३ मे – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता, संध्याकाळी ७.३० वाजता

चेन्नई सुपर किंग्स – २५ खेळाडू (८ परदेशी)

एमएस धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अंबाती रायुडू, केएम आसिफ, दीपक चाहर, ड्वेन ब्राव्हो, फाफ डु प्लेसिस, इमरान ताहिर, नारायण जगदीसन, कर्ण शर्मा, लुंगी एन्गिडी, मिशेल सँटनर, रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, जोश हेझलवुड, आर साई किशोर, सॅम करन, रॉबिन उथप्पा, कृष्णप्पा गौतम, मोईन अली, चेतेश्वर पुजारा, के भागवथ वर्मा, सी हरी निशांथ, एम हरिशंकर रेड्डी

महत्त्वाच्या बातम्या-

अरेरे! फक्त क्विंटन डीकॉक नव्हे तर ‘या’ यष्टीरक्षकानेही पाकिस्तानी फलंदाजाला काढले होते वेड्यात

अविस्मरणीय खेळी: गांगुलीने ‘तो’ निर्णय घेतला अन् धोनीने पहिलं-वहिलं शतक झळकावत स्वत:ला सिद्ध केलं

मुंबईचा महान क्रिकेटपटू हरपला, भलेभले दिग्गज खेळले होते त्यांच्या नेतृत्वाखाली 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---